सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटाचा प्रदर्शित होताच त्यावर टीका होत आहे. काँग्रेससह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची युवा शाखा DYFI आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML) च्या युथ लीगने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. चित्रपटाची कथा चार महिलांची आहे ज्यांना मुस्लिम धर्मात परिवर्तन करून दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील केले जाते.

एकीकडे काही लोक या चित्रपटाला प्रचंड विरोध करत आहेत, तर काहींनी चित्रपटाला डोक्यावर घ्यायला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर दोन गट पडलेले पाहायला मिळत आहेत. ज्येष्ठ कॉँग्रेस नेते शशी थरूर यांनी त्यांच्या ट्वीटमधून यावर टीका केली आहे. आता तर तर चक्क संगीतसम्राट ए.आर.रेहमान यांनीदेखील यात उडी घेतली आहे. नुकतंच केरळच्या एका मशिदीत एका हिंदू जोडप्याच्या विवाह सोहळ्याचा व्हिडिओ रेहमान यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.

Vishwa Hindu Parishad on temple and mosque row
“…म्हणून मशिदीच्या जागेवरील दावे वाढत आहेत”, विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यानं सांगितलं कारण
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Yatra of Yallama Devi begins in Jat
यल्लमा देवीच्या यात्रेस जतमध्ये प्रारंभ
Dabur Vs Patanjali
Dabur Vs Patanjali : च्यवनप्राशच्या जाहिरातीवरून डाबर आणि पतंजली भिडले! बाबा रामदेव यांच्या कंपनीला दिल्ली उच्च न्यायालयाचे समन्स
ishwar allah tero naam bhajan news
Protest on Bhajan: ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम’ भजनावर आक्षेप घेत घोषणाबाजी; अटल बिहारी वाजपेयींच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात गोंधळ!
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष

आणखी वाचा : ‘The Kerala Story’ला ‘The Kashmir Files’प्रमाणे डोक्यावर घेणाऱ्यांना ‘हे’ सत्य माहीत आहे का?

या व्हिडिओबरोबर लिहिण्यात आले होते की, “ही पहा केरळची आणखी एक कहाणी.” अशातच हा व्हिडिओ शेअर करताना रेहमान यांनी त्या जोडप्याचे कौतूक केले, रेहमान यांनी लिहिले, “शाब्बास. मानवतेवरचे प्रेम हे असंच बिनशर्त आणि सगळे घाव भरणारे असावे.” वधूच्या आईची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने लग्नाचा खर्च तिला करणं शक्य नव्हते, अशातच केरळच्या अलप्पुझा शहरातील मशिदीत या जोडप्याच्या लग्नासाठी सोय करून देण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे.

‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाच्या वादादरम्यानच एआर रेहमान यांनी हा व्हिडिओ शेअर करत त्या जोडप्याचे अन् त्या कृतीचे कौतूक केल्याने आणखी चर्चा होत आहे.केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनीही या चित्रपटावर भाष्य केलं. हा ‘आरएसएस’चा अजेंडा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट ५ मे रोजी चित्रपट गृहात झळकणार आहे.

Story img Loader