‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे, चित्रपटाच्या कथेवरून नव्या वादाला सुरुवात झाली आहे. अनेक राज्यांनी चित्रपटावर बंदी घातली असतानाच दुसरीकडे मात्र काही राज्यात ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. मध्य प्रदेशनंतर आता उत्तर प्रदेशमध्येही ‘द केरळ स्टोरी’ करमुक्त करण्यात येत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्वीट करीत ही माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्वीट केले आहे की उत्तर प्रदेश सरकार नुकताच प्रदर्शित झालेला ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट राज्यात करमुक्त घोषित करील. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसह ‘लोक भवन’ येथे होणाऱ्या विशेष स्क्रीनिंगमध्ये हा चित्रपट पाहू शकतात, अशी माहिती मुख्यमंत्री सचिवालयाने दिली आहे.

Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
tarak mehta ka ooltah chashmah fame mandar chandwadkar dance with wife watch video
Video: ‘तारक मेहता…’ मधील भिडे मास्तर पोहोचले पेरुच्या शेतात अन् बायकोबरोबर केला मकरंद अनासपुरेंच्या गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
Puneri kaka dance video uncle aunty dance video goes viral on social media
VIDEO: पुणेकर काकांचा नाद नाय! चंद्रा गाण्यावर केला खतरनाक डान्स; नेटकरी म्हणतात “आयुष्य असं जगता आलं पाहिजे”
Kartik Ekadashi celebration celebrated in traditional spirit at Sri Kshetra Pandharpur Branch with Shri Gajanan Maharaj Sansthan
‘कार्तिकी’निमित्त शेगावात भाविकांची मांदियाळी; पालखी परिक्रमा लक्षवेधी
UP CM Yogi Adityanath
Yogi Adityanath : ‘बटेंगे तो कटेंगे’ हा नारा देऊन योगी आदित्यनाथ यांनी काय साधलं?
Ajit Pawar on Yogi Adityanath
योगी आदित्यनाथांमुळे अजित पवारांची गोची; मोदी-शाहांची एकही सभा नाही; अस्तित्वाची लढाई राष्ट्रवादी कशी लढणार?

उत्तर प्रदेश भाजपाचे सचिव राघवेंद्र मिश्रा यांनी नुकताच लखनऊमध्ये १०० विद्यार्थिनींना हा चित्रपट दाखवला. यासह वादग्रस्त चित्रपट ‘टॅक्स फ्री’ बनवणारे उत्तर प्रदेश हे मध्य प्रदेशनंतर दुसरे राज्य ठरले आहे. गेल्या वर्षीदेखील, अक्षय कुमारचा ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटदेखील राज्यात करमुक्त घोषित केल्यानंतर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी विशेष स्क्रीनिंगमध्ये बघितला होता.

हेही वाचा- ‘The Kerala Story’ ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड कायम, चौथ्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी

या चित्रपटाला भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा मिळाला आहे बेल्लारी येथील प्रचारसभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाचा उल्लेख करीत काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. मोदी म्हणाले, दहशतवादी कट असलेल्या एका कथानकावर आधारित चित्रपट ‘द केरला स्टोरी’ सध्या खूप चर्चेत आहे. हा चित्रपट केवळ एका राज्यातल्या दहशतवादी कटांवर आधारित आहे. केरळ हे देशातले खूप सुंदर राज्य आहे. केरळमधले लोक खूप परिश्रमी आणि प्रतिभावान असतात. परंतु त्याच केरळमध्ये सुरू असलेल्या दहशतवादी कटाचा खुलासा या चित्रपटाने केला आहे.