काश्मीर फाईल्सनंतर आता सध्या चर्चेत ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट चर्चेत आला आहे. विपुल अमृतलाल शाह यांचा आगामी चित्रपट ‘द केरळ स्टोरी’ पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. केरळ राज्यात बेपत्ता झालेल्या ३२,००० महिलांची कथा या चित्रपटातून उलगडण्यात येणार आहे. आता या चित्रपटाच्या बाबतीत एक अडचण निर्माण झाली आहे. या चित्रपटाच्या टीझरवर आता एफआयआर दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. हा टीझर प्रदर्शित होतच काहीच मिनिटात हा टीझर लाखो लोकांनी पाहिला. ANI च्या माहितीनुसार केरळचे डीजीपीआय यांनी तिरुअनंतपूरम येथील पोलीस आयुक्तांना या टीझरच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. टीझरच्या विरोधात केरळच्या मुख्यमंत्र्यांना मिळालेल्या तक्रारीवरून हे आदेश देण्यात आले आहेत. हाय टेक इंक्वायरी सेलने याची प्राथमिक तपासणी केली असून त्याचा अहवाल डीजीपींना पाठवला आहे.

आणखी वाचा : ‘बिग बॉस’च्या घरात साजिद खानच्या वर्तणूकीवरून नेटकरी संतापले; गोरी नागोरीशी वाद ठरला निमित्त

केरळ राज्यात बेपत्ता झालेल्या ३२,००० महिलांची कथा या चित्रपटातून उलगडण्यात येणार आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे असं म्हंटले जात आहे. टीझरमध्ये दाखवण्यात आले आहे की एका मुलीचे नर्स बनण्याचे स्वप्न असते. परंतु तिचे घरातून अपहरण करण्यात येते आणि तिचे धर्मांतर करून तिला आयएसआयएस दहशतवादी म्हणून अफगाणिस्तानमध्ये जेरबंद केले जाते. एका सामान्य मुलीला दहशतवादी बनवण्यात येतं. ती एकटीच नव्हे तर अशा ३२,००० महिलांना तेथे आणून दहशतवादी बनवण्यात आलं आहे असा खुलासा ती टीझरमध्ये करत आहे.

‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाची निर्मिती विपुल शाह यांनी केली असून सुदिप्तो सेन या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. हा चित्रपट दहशतवादी संघटनेनं केलेल्या महिलांच्या तस्करीची सत्यता सांगत आहे. या चित्रपटाच्या साध्या पण हृदयद्रावक टीझरमध्ये एका महिलेची कहाणी पाहायला मिळते. ही भूमिका अदा शर्मा साकारताना दिसत आहे.