The Sabarmati Report Box Office Collection Day 1: विक्रांत मॅसीची मुख्य भूमिका असलेल्या ‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटाची मागील काही दिवसांपासून खूप चर्चा होती. अखेर हा चित्रपट शुक्रवारी (१५ नोव्हेंबर रोजी) सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.
‘द साबरमती रिपोर्ट’ २००२ मध्ये गुजरातच्या गोध्रातील साबरमती एक्सप्रेसमध्ये घडलेल्या घटनेवर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन निराशाजनक आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा फार चांगला प्रतिसाद मिळालेला नाही. चित्रपटाने पहिल्या दिवशी देशभरात फक्त दीड कोटी रुपयांची कमाई केली आहे.
हेही वाचा – Kanguva: ३५० कोटींचे बजेट असलेल्या ‘कंगुवा’ची निराशाजनक सुरुवात, पहिल्या दिवशी कमावले फक्त…
‘द साबरमती रिपोर्ट’चे बॉक्स ऑफिस कलेक्शन
द
इंडस्ट्री ट्रॅकर सॅल्कनिकने दिलेल्या वृत्तानुसार, ‘द साबरमती रिपोर्ट’ने पहिल्या दिवशी दीड कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. ५० कोटी रुपयांचे बजेट असलेल्या या चित्रपटाची ओपनिंग खूपच संथ आहे. त्यामुळे हा चित्रपट वीकेंडला किती कमाई करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटात विक्रांत मॅस्सी, राशी खन्ना, रिद्धी डोगरा यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन धीरज सरनाने केले आहे. या चित्रपटाची निर्मिती एकता कपूरने केली आहे. या चित्रपटातून कोणत्याही धर्माला लक्ष्य करत नसल्याचं एकताने म्हटलंय. “मी हिंदू आहे, याचा अर्थ मी धर्मनिरपेक्ष आहे. मी कोणत्याही धर्मावर कधीच भाष्य करणार नाही कारण मी हिंदू आहे,” असं ती म्हणाली.
हेही वाचा – ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनशी लग्न केल्यानंतर सलमान खान म्हणालेला, “माझ्या आयुष्याचा एक…”
चित्रपटासाठी कोणाचीही मदत घेतली नाही – एकता कपूर
एका पत्रकार परिषदेदरम्यान एकता कपूरला विचारण्यात आलं की, तिने हा चित्रपट बनवण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संवाद साधला होता का. कारण जेव्हा २००२ मध्ये ही घटना घडली तेव्हा मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. या प्रोजेक्टसाठी आपण पंतप्रधान मोदी किंवा केंद्र सरकारमधील कोणाचीही मदत घेतलेली नाही, असं एकताने स्पष्ट केलं. “मी कोणत्याही राजकीय गटाशी संबंधित नाही. मी फक्त सत्याच्या बाजूने आहे,” असं एकता म्हणाली. आज तकने हे वृत्त दिलंय.