Swara Bhaskar Fahad Ahmad Live : अभिनेत्री स्वरा भास्कर मागील काही वर्षापासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. दोन वर्षांपूर्वी तिने फहाद अहमदशी लग्न केलं आणि नंतर एका गोंडस मुलीची आई झाली. स्वरा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे, ती अनेक सामाजिक, राजकीय विषयांवर तिची मतं मांडत असते. आज इंडियन एक्सप्रेसच्या द सुवीर सरन शोमध्ये ती व तिचा पती फहाद अहमद त्यांचे वैयक्तिक आयुष्य, व्यावसायिक आयुष्य, राजकारण या विषयांवर मनमोकळेपणाने बोलणार आहेत.