विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केलेला बहुचर्चित ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट २८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. ‘द काश्मीर फाइल्स’ या सुपरहिट चित्रपटानंतर विवेक अग्निहोत्री करोना काळात स्वदेशी लस निर्मिती करणाऱ्या टीमवर आधारित चित्रपट घेऊन आले. करोना काळातील परिस्थितींवर भाष्य करणारा हा चित्रपट प्रेक्षकांना आकर्षित करण्यात अपयशी ठरला आहे.

“विवेक अग्निहोत्रीने नशेत माझ्याबरोबर…”, महिलेचा आरोप; कंगना रणौत उत्तर देत म्हणाली, “मला बरबाद…”

‘द व्हॅक्सिन वॉर’ सिनेमागृहात प्रदर्शित होऊन पाच दिवस झाले आहेत. पण हा चित्रपट १० कोटीही कमवू शकलेला नाही. चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचं दिसत आहे. चित्रपटाच्या कमाईचे आकडे खूपच निराशाजनक आहेत. ‘सॅकनिल्क’च्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाने पहिल्या दिवशी ८५ लाख रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी ९० लाख, तिसऱ्या दिवशी १.७५ लाख रुपये, चौथ्या दिवशी २.२५ कोटी आणि सोमवारी १.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाची एकूण कमाई ७ कोटी २५ लाख रुपये झाली आहे.

Video: ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटात बॉबी देओलचा जबरदस्त लूक, वडील धर्मेंद्र यांनी व्हिडीओ शेअर करत दिली प्रतिक्रिया

दरम्यान, या चित्रपटात नाना पाटेकर यांची मुख्य भूमिका आहे. त्यांनी डॉ. बलराम भार्गव यांचे पात्र साकारले आहे. याशिवाय रायमा सेनने महिला पत्रकाराची भूमिका साकारली आहे. चित्रपटात पल्लवी जोशी, गिरीजा ओक गोडबोले, अनुपम खेर, सप्तमी गौडा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.