विवेक अग्निहोत्री यांचा ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. नुकतंच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा याला उदंड प्रतिसाद मिळत आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटापासूनच विवेक अग्निहोत्री हे कायम चर्चेत आहेत. चित्रपटाबरोबरच ते बॉलिवूडबद्दल अन् स्टार सिस्टमबद्दल परखडपणे भाष्य करतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चित्रपटसृष्टीतील राजकारण, घराणेशाही याबद्दलही विवेक यांनी बऱ्याचदा भाष्य केलं आहे. याबरोबरच ते राजकीय भूमिका घ्यायलाही पुढे मागे बघत नाहीत. यामुळे बऱ्याचदा त्यांच्यावर टीकाही झालेली आहे. गेल्या वर्षाचं चित्र पाहता विवेक अग्निहोत्री हे कायम प्रोपगंडा चित्रपट बनवतात असा आरोप बऱ्याचदा त्यांच्यावर केला गेला आहे.

आणखी वाचा : कास्टिंग काउचचे अनुभव अन् यश चोप्रा यांना भेटायला दिलेला नकार; अदिती गोवित्रीकरने दिलं स्पष्टीकरण

‘नवभारत टाईम्स’शी संवाद साधताना विवेक यांनी त्यांच्यावर लागलेले आरोप खोडून काढले आहेत. ते म्हणाले, “दरवर्षी बनणाऱ्या महत्त्वपूर्ण चित्रपटांच्या यादीत आमचं नाव कधीच नसतं. आजकाल एखादं पोस्टर जरी प्रदर्शित झालं तरी त्यावर भरपूर चर्चा होते. आमच्या चित्रपटाचा ट्रेलर आलाय तरी कुणीच फारशी दखलही घेतलेली नाही. ही लोक तर मला फिल्ममेकर म्हणूनही मान्यता देत नाहीत, इंडस्ट्री माझ्या चित्रपटांना प्रोपगंडा म्हणते, पण माझा चित्रपट हा जनतेसाठी आहे ज्यांना विचार करायचा आहे.”

यामागील कारण सांगताना अग्निहोत्री म्हणाले, “यासाठी फिल्म इंडस्ट्रीमधील अन् राजकारणातील काही लोक कारणीभूत आहेत. मी जर एखादा पोलिटिकल चित्रपट बनवला तर ज्यांना तो पटणार नाही ते त्याचा विरोध करणारच आहे. यासिर मल्लीकसारख्या माणसाला दिल्लीत बोलावून पुरस्कार देणाऱ्या लोकांना आमचा ‘द काश्मीर फाइल्स’ हा प्रोपगंडा वाटणारच त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The vaccine war director vivek agnihotri answers to them who calls his film propaganda avn