सलमान खान व कतरिना कैफ यांचा बहुचर्चित ‘टायगर ३’ चित्रपट दिवाळीच्या दिवशी म्हणजेच रविवारी प्रदर्शित झाला. प्रेक्षक अनेक दिवसांपासून या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. रविवारची सुट्टी असल्याने चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली होती. ‘एक था टायगर’ व ‘टायगर जिंदा है’ नंतर सलमान व कतरिनाच्या स्पाय चित्रपटासाठी प्रेक्षक किती गर्दी करणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.

नुकतंच ‘टायगर ३’ने एक नवा रेकॉर्ड रचल्याचं स्पष्ट झालं आहे. हिंदी चित्रपटाच्या इतिहासात ‘टायगर ३’ हा दिवाळीच्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने जगभरात तब्बल ९४ कोटींची कमाई केली आहे. यापैकी भारतातील एकूण कमाई ही ५२.५० कोटी असून बाहेरील देशांमध्ये या चित्रपटाने दिवाळीच्या पहिल्याच दिवशी तब्बल ४१.५० कोटींची कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर एवढी कमाई करत असूनसुद्धा या चित्रपटावर बरीच टीका होताना दिसत आहे. प्रेक्षकांच्या मिश्र प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळत आहेत.

Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
sonakshi sinha reaction on pregnancy rumours
सोनाक्षी सिन्हाने गरोदर असल्याच्या अफवांवर दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “लोक वेडे…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Shashank Arora
“आम्ही वाळवंटात भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरजवळ…”, इरफान खान यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत अभिनेता म्हणाला, “मला पतंग…”

सलमान खानचा चित्रपट म्हंटलं की त्यात मनोरंजन हे भरभरून असतंच आणि त्याबाबतीत कुठेही कमतरता नाहीये, पण चित्रपटातील काही गोष्ट प्रेक्षकांना प्रचंड खटकल्या आहेत ज्यामुळे चित्रपटावर नकारात्मक परिणाम होताना दिसत आहे. या ४ गोष्टींमुळे ‘टायगर ३’ अजिबात पाहू नये असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. त्या ४ गोष्टी कोणत्या आहेत याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत.

१. कमकुवत पटकथा आणि लिखाण :
सलमान खानच्या स्टारडमवर पैसा कमावण्याच्या नादात ‘टायगर ३’च्या निर्मात्यांनी पटकथा व लिखाणावर अजिबात मेहनत घेतली नसल्याची तक्रार प्रेक्षकांनी केली आहे. आदित्य चोप्रा आणि श्रीधर माधवन यांनी लिहिलेली कथा ही फार विस्कळीत आणि कमकुवत असल्याचं प्रेक्षकांनी म्हंटलं आहे.

२. सलमानच्या धासु डायलॉग्सचा अभाव :
‘वॉन्टेड’पासून ‘किक’, ‘दबंग’पर्यंत सलमान खानचे चित्रपट म्हंटलं की त्यात टाळ्या शिट्टी मिळवणारे डायलॉग असणार हे ठरलेलंच असतं. ‘टायगर ३’मध्ये ही गोष्ट कटाक्षाने टाळल्याने प्रेक्षकांचा हिरमोड झाला असल्याचं सांगितलं जात आहे. “जब तक टाइगर मरा नहीं, तब तक टाइगर हारा नहीं” हा एक दमदार डायलॉग सोडला तर प्रेक्षकांच्या लक्षात राहील असा एकही डायलॉग चित्रपटात नसल्याने प्रेक्षक निराश झाले असल्याचं समोर आलं आहे.

tiger3
फोटो : सोशल मिडिया

३. पाकिस्तानचे गुणगान :
चित्रपटात पाकिस्तानचे गोडवे गायले असल्याने बऱ्याच लोकांना ते खटकलं असल्याचं त्यांनी सोशल मीडियावर नमूद केलं आहे. चित्रपटात टायगर हा रॉचा एजेंट आयएसआयच्या सोबतीने पाकिस्तानच्या लोकशाहीचा आणि त्यांच्या पंतप्रधानांचा बचाव करताना दाखवलं आहे, इतकंच नव्हे तर पाकिस्तान हा शांतीप्रिय देश असल्याचंही या चित्रपटातून दाखवण्यात आलं आहे. यामुळे बरेच प्रेक्षक नाराज झाले असून कमर्शियल चित्रपटात अशा प्रकारचं राजकीय भाष्य त्यांच्या पसंतीस न उतरल्याने त्यांनी यावर टीका केली आहे.

४. सर्वात कमकुवत खलनायक :
‘पठाण’च्या बाबतीत जॉन अब्राहमसारख्या दमदार खलनायकाने चित्रपटाला उचलून धरलं होतं आणि त्यामुळेच कदाचित शाहरुखचा अभिनय अधिक उठून दिसला. ‘टायगर ३’मध्ये केवळ सगळं लक्ष सलमानवरच असल्याने इम्रान हाशमीच्या पात्राकडे कानाडोळा झाल्याचं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. इम्रान हा अत्यंत ताकदीचा नट आहे आणि त्यामानाने एक खलनायक म्हणून सलमानसमोर त्याला उभं करण्यात लेखक आणि दिग्दर्शक कमी पडले असल्याचं कित्येकांनी स्पष्ट केलं आहे.

आणखी वाचा : दिवाळीच्या दिवशी ‘टायगर ३’ने रचला इतिहास; ‘इतके’ कोटी कमवत सलमान खानचं बॉक्स ऑफिसवर दमदार कमबॅक

‘टायगर ३’मध्ये सलमानसह कतरिना कैफ, इम्रान हाशमी यांच्या प्रमुख भूमिका आहेत, तसेच चित्रपटातील शाहरुखच्या कॅमिओचीही जबरदस्त चर्चा आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू या तीनही भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे.

Story img Loader