२०२२ हे वर्ष काही बॉलिवूड स्टार्ससाठी भाग्याचं ठरलं, तर काहींना यावर्षी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. व्यावसायिक तसंच वैयक्तिक आयुष्यात अनेक कलाकारांनी चढ-उतार पाहिले. तर काहींनी यांची स्वप्नं साकार केली. यावर्षी अनेक बॉलिवूड स्टार्सनी नवीन त्यांचं ड्रीम होम खरेदी केलं. अशाच काही आघाडीच्या कलाकारांच्या नवीन मालमत्तेचा आपण आढावा घेणार आहोत.
रणवीर सिंग – दीपिका पदुकोण :
सिनेसृष्टीचे आघाडीचे कलाकार रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण हे यावर्षी अलिबागकर झाले आहेत. अलिबाग तालुक्यातील मापगाव येथे ९० गुंठे एने जागा २२ कोटीला खरेदी केली आहे. रणवीर आणि दीपिकाने मुंबईपासून जवळ असलेल्या अलिबागमध्ये दोन बंगले खरेदी केले आहेत.
मिलिंद सोमण :
अभिनेता मिलिंद सोमण याने सप्टेंबरमध्ये मुंबईतील प्रभादेवी परिसरामध्ये एक नवीन आलिशान घर खरेदी केलं आहे. त्याचं हे सी-फेसिंग घर ४ बीएचके असून या घराची जागा १७२० स्क्वेअर फीट आहे. त्याचं हे घर दादर बीचच्या अगदी जवळ आहे. तसंच प्रभादेवी परिसरात हे घर असल्याने तेथून सिद्धिविनायक मंदिरही अगदी जवळ आहे. मिलिंदचं हे घर सूरज इस्टेट डेव्हलपर्स लिमिटेडच्या ‘ओशन स्टार’ या स्टँडअलोन टॉवरमध्ये आहे.
विवेक अग्निहोत्री :
विवेक अग्निहोत्री यांनी मुंबईतील प्रतिष्ठित अशा वर्सोवा भागात Ecstasy Realty यांच्याकडून फ्लॅट खरेदी केला आहे. ज्या इमारतीत त्यांनी फ्लॅट घेतला आहे, ती इमारत ३० मजली असणार आहे. घर त्यांचं नवीन घराचा परिसर ३२५८ चौरस फूट क्षेत्रफळ इतका आहे. त्याचबरोबरीने ३ गाड्या पार्क होतील अशी सोय त्यामध्ये आहे. १७.९२ कोटी इतकी या फ्लॅटची किंमत आहे.
अमिताभ बच्चन :
अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील एका गगनचुंबी इमारतीमध्ये १२ हजार स्क्वेअर फुटांचा फ्लॅट घेतला. पार्थेनॉन सोसायटीच्या ३१व्या मजल्यावर त्यांनी ही मालमत्ता खरेदी केली. परंतु अमिताभ इथे राहणार नाहीत. त्यांनी गुंतवणुकीसाठी ही मालमत्ता खरेदी केली असल्याचं सांगितलं गेलं आहे.
सनी लिओनी :
सनी लिओनीने मुंबईतल्या अंधेरी भागात ४,३६५ चौरस फूटाचा फ्लॅट खरेदी केला आहे. याची किंमत आहे १६ कोटी रुपये. हा व्यवहार २८ मार्चला झाल्याची नोंद आहे. रिऍल्टर क्रिस्टल प्राईड डेव्हलपर यांचा हा प्रकल्प आहे. हा फ्लॅट बाराव्या मजल्यावर आहे. टाईम्सच्या वृत्तानुसार, सनीला तीन गाड्यांसाठी मेकॅनाईझ्ड कार पार्किंगही मिळलं आहे.