‘गदर: एक प्रेम कथा’ या चित्रपटाच्या सिक्वेलची सध्या चांगलीच चर्चा आहे. ‘गदर २’ मध्ये पुन्हा एकदा सनी देओल आणि अमिषा पटेलची जोडी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. प्रजासत्ताक दिनाचे अवचित्य साधून या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं. पहिल्या चित्रपटात दमदार अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातल्यावर ‘गदर २’ चित्रपटात सनी देओल पुन्हा एकदा तारा सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पहिल्या चित्रपटाच्या वेळी जेवढी चर्चा सनी देओलची झाली तेवढीच चर्चा या चित्रपटातील खलनायकाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते अमरिश पुरी यांचीसुद्धा झाली. त्यांनी साकारलेली एका पित्याची आणि राजकीय नेत्याची भूमिका आजही लोकांच्या स्मरणात आहे. ‘गदर २’मध्ये त्यांची कमतरता नक्कीच भासणार आहे, पण या दुसऱ्या भागात खलनायक कोण साकारणार यावरून चर्चा सुरू आहे.

आणखी वाचा : चित्रपटगृहांच्या आवारात रिव्यू शूट करता येणार नाहीत; केरळच्या संस्थेने सांगितलं या मोठ्या निर्णयामागील कारण

मीडिया रीपोर्टनुसार ‘गदर २’मध्ये मनीष वाधवा हा अभिनेता खलनायकाची भूमिका साकारणार असल्याची चर्चा सुरू आहे. मनीषने नुकतंच शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटात एक नकारात्मक भूमिका साकारली होती. त्यानंतर आता थेट ‘गदर २’मध्ये मनीष सनी देओलशी टक्कर घेताना दिसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मनीषला या भूमिकेत बघण्यासाठी सगळेच खूप उत्सुक आहेत. शिवाय या चित्रपटाला अमरिश पुरी यांच्या तोडीचा खलनायक मिळणंदेखील तितकंच आवश्यक आहे. ‘गदर २’चं दिग्दर्शनही अनिल शर्मा करणार आहेत. हा चित्रपट १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर बेतलेला असेल आणि यात तारा सिंगचा त्याच्या मुलाला पाकिस्तानातून भारतात आणण्याचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. ‘गदर २’ ११ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This actor from pathaan movie will play villains role in sunny deol most awaited gadar 2 avn