अभिनेते रवि किशन यांनी अनेक भोजपूरी चित्रपट, बॉलीवूड सिनेमे तसेच वेब सीरिजमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. रवि किशन अभिनयाबरोबरच राजकारणीदेखील आहेत. त्यांच्या अभिनयाची कारकिर्द तर सगळ्यांना ठाऊकच आहेच पण त्यांचं वैयक्तिक आयुष्य थोडं खडतर होतं.

रवि किशन जरी आज खूप यशस्वी आणि लोकप्रिय असले तरी त्यांच्या वडिलांना त्यांनी अभिनय क्षेत्रात यावं ही गोष्ट नेहमी खटकायची आणि याच गोष्टीमुळे त्यांनी त्यांच्या वडिलांचा खूप मार खाल्ला होता. याबद्दल त्यांनी एका मुलाखतीत खुलासा केला आहे.

हेही वाचा… ‘अप्पी आमची कलेक्टर’ फेम शिवानी नाईक आणि साईराज केंद्रेला पडली ‘पुष्पा-२’ च्या गाण्याची भुरळ, व्हिडीओ व्हायरल

नुकत्याच ब्रूटला दिलेल्या मुलाखतीत रवि किशन यांनी याबदद्लचा किस्सा सांगितला आहे. रवि किशन आणि त्यांच्या वडिलांमध्ये चांगले संबंध नव्हते. ते अभिनय क्षेत्रात जाणं त्यांच्या वडिलांना पसंत नव्हतं आणि याच कारणामुळे बाप-लेकात भांडण व्हायचं.

रवि किशन यांनी सांगितलं की, “एकदा घराजवळच रामलीला होती आणि त्यात मी सहभाग घेतला होता.मी अभिनय करणार हे समजताच माझ्या वडिलांचा राग अनावर झाला आणि यासाठी मला वडिलांनी खूप मोठी शिक्षा केली होती. त्यावेळेस माझ्या वडिलांनी मला खूप मारलं होतं.”

रवि किशन पुढे म्हणाले, “माझे वडिल मला खूप मारत होते त्यांना मला मारूनच टाकायचं होतं. तेव्हा माझ्या आईला हे समजलं होतं की ते मला मारायला मागे-पुढे बघणार नाहीत. आईला त्यांना खूप चांगलंच ओळखायची. कारण माझे वडिल पुजारी लोकांमधले आहेत, साधु संतांसारखे. त्यांना लोकांच्या भावनांशी जास्त जोडलेलेच नव्हते.

हेही वाचा… “माझ्या नावाचा गैरवापर…”, करण जोहरची न्यायालयात धाव, ‘या’ चित्रपटाच्या शीषर्कावर बंदी घालण्याची मागणी

रवि किशन यांनी असंही सांगितलं की, त्यांच्या आईने त्यांना घरातून पळून जाण्यास सांगितलं. त्यांच्या आईने त्यांना सांगितलं होतं की, तू इथून पळून जा नाहीतर तू वाचणार नाहीस. तेव्हा रवि किशन खिशात ५०० रुपयांची नोट घेऊन तिथून पळाले. त्यानंतर त्यांनी ट्रेन पकडली आणि ते मुंबईला आले. अशाप्रकारे सवि किशन यांच्या स्टार बनण्याचा प्रवास सुरू झाला.

हेही वाचा… “आपला लक्ष्या गेला रे…”, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या निधनाबद्दल महेश कोठारे झाले व्यक्त, म्हणाले…

दरम्यान, रवि किशन नुकतेच किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडिज’ या चित्रपटात झळकले होते. जहांगीर नेशनल यूनिवर्सिटी (JNU) या आगामी चित्रपटात ते झळकणार आहेत.