बॉलीवूडमध्ये दरवर्षी अनेक रोमँटिक चित्रपट तयार होतात. आजकाल बऱ्याच चित्रपटांमध्ये रोमँटिक व किसिंग सीन असतात. असे सीन शूट करणं खूप अवघड असतं. अनेकदा कलाकार एकमेकांबरोबर कंफर्टेबल नसतात, त्यामुळे सीन नीट शूट होत नाही आणि रिटेक घ्यावे लागतात. अशाच एका सीनचा किस्सा बॉलीवूडमध्ये खूप गाजला होता. एका चित्रपटातील किसिंग सीनसाठी अभिनेत्याने तब्बल ३७ रिटेक घेतले होते.
या चित्रपटातील बॉलीवूड अभिनेत्याने आतापर्यंत १८ चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यापैकी आठ चित्रपट सुपरहिट झाले आणि तीन चित्रपटांनी जबरदस्त कमाई केली, तसेच अनेक रेकॉर्ड मोडले. बॉलीवूडचा चॉकलेट बॉय असलेल्या या अभिनेत्याने एका रोमँटिक सीनसाठी एक दोन नव्हे तर तब्बल ३७ रिटेक घेतले होते. इतके रिटेक या चित्रपटातील अभिनेत्रीमुळे घ्यावे लागले, असं त्याने म्हटलं होतं.
हेही वाचा – “सूरज चव्हाण या तुमच्यातल्या माणसाला…”, दिग्दर्शक केदार शिंदे यांची पोस्ट चर्चेत
ही गोष्ट १० वर्षांपूर्वी म्हणजेच २०१४ मधील ‘कांची: द अनब्रेकेबल’ चित्रपटाची आहे. या चित्रपटात अभिनेत्री मिष्टी चक्रवर्ती व कार्तिक आर्यन यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटात कार्तिकने एका प्रेमात पडलेल्या तरुणाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुभाष घई यांनी केले होते. या चित्रपटात एक किसिंग सीन होता, ज्यामुळे कार्तिक नाराज झाला होता.
हेही वाचा – Video: लोकलने प्रवास करणाऱ्या ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलंत का? सीरिज नेटफ्लिक्सवर आहे ट्रेंडिंग
काय म्हणाला होता कार्तिक आर्यन?
कार्तिक आर्यनने एका मुलाखतीत या किसिंग सीनबद्दल सांगितलं होतं. “हा किसिंग सीन एवढा मोठा डोकेदुखी ठरेल, असं मला कधीच वाटलं नव्हतं. त्या दिवशी आम्ही प्रेमी युगुलांसारखे वागत होतो. पण एक सीन नीट शूट व्हावा, यासाठी आम्हाला ३७ रिटेक करावे लागले. शेवटी सुभाषजी आले आणि ‘ठीक आहे’ म्हणाले तेव्हा आम्हाला वाटलं की झालं बाबा एकदाचं,” असं कार्तिक म्हणाला होता.
कार्तिकने त्याच मुलाखतीत या सीनसाठी एवढे रिटेक घ्यावे लागले त्यासाठी मिष्टी जबाबदार असू शकते, असं म्हटलं होतं. “त्यावेळी मिष्टी जाणूनबुजून सीन नीट करत नव्हती, अशी शक्यता आहे. सुभाष घई यांना एक पॅशनेट किसिंग सीन हवा होता आणि मला किस कसे करायचे हे माहीत नव्हतं. मी त्यांना विचारणार होतो, ‘सर, मला किस कसे करायचे ते दाखवा’,” असं कार्तिक म्हणाला होता.
‘कांची: द अनब्रेकेबल’मध्ये मिथुन चक्रवर्ती, ऋषी कपूर, आदिल हुसेन, मुकेश भट्ट, चंदन रॉय सान्याल, रिषभ सिन्हा आणि महिमा चौधरी यांच्या भूमिका होत्या. या चित्रपटात मिष्टीने कांचीचे पात्र केले होते, तर कार्तिक आर्यन बिंदाच्या भूमिकेत होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता.