फोटोत दिसणाऱ्या अभिनेत्याचं सिनेसृष्टीशी काहीच कनेक्शन नव्हतं. सैन्याची कौंटुबिक पार्श्वभूमी असलेल्या या अभिनेत्याचे आजोबा, ब्रिगेडियर गुरदयाल सिंग यांनी स्वातंत्र्यानंतर भारतीय सैन्यासाठी पहिली तोफ (Artillery Gun) डिझाईन केली होती. या अभिनेत्याने मॉडेलिंगमध्ये नशीब आजमावलं. तिथे यश मिळाल्यानंतर त्याला सिनेमाची ऑफर आली.
लहानपणीच आई-वडिलांचा घटस्फोट झाल्याने हा अभिनेता आईबरोबर राहत होता. त्याची आई शिक्षिका होती. शिक्षण पूर्ण केल्यावर तो ग्लॅमर इंडस्ट्रीत आला. तो मॉडेलिंग विश्वात लोकप्रिय झाला. पण त्याचा पदार्पणाचा पहिलाच चित्रपट फ्लॉप झाला. त्याचे करिअरमधील जवळपास १४ चित्रपट फ्लॉप झाले, पण एका सिनेमासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
हेही वाचा – ३ महिन्यांची झाली लेक, बॉलीवूड अभिनेत्रीने नाव केलं जाहीर; ‘मतारा’चा अर्थ काय? वाचा…
कोण आहे हा अभिनेता?
हा बॉलीवूड अभिनेता म्हणजे अर्जुन रामपाल होय. मॉडेलिंगमध्ये नाव कमावल्यानंतर अर्जुन अभिनयक्षेत्राकडे आला. त्याला दिवंगत डिझायनर रोहित बलने दिल्लीत एका कार्यक्रमात पाहिल्यानंतर अभिनयाची संधी दिली होती. त्याने २००१ मध्ये ‘प्यार इश्क और मोहब्बत’ या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. पण हा चित्रपट फ्लॉप झाला. त्यानंतर अर्जुनवर आर्थिक संकट आलं, त्याला प्रचंड संघर्ष करावा लागला. एक वेळ अशी आली की त्याच्याकडे घराचं भाडं भरण्याचे पैसे नव्हते. पण त्याचा घरमालक चांगला होता, त्याने अर्जुनला पैसे येतील तेव्हा भाडं दे असं सांगितलं. अर्जुनने संघर्ष सुरूच ठेवला, त्याला २००६ मध्ये ‘डॉन’ चित्रपट मिळाला. या चित्रपटानंतर अर्जुनचं नशीब पालटलं. हा चित्रपट हिट झाला आणि मग त्याने त्याच्या पुढच्या वर्षी शाहरुख खानबरोबर काम केलं. तोही चित्रपट हिट झाला आणि नंतर त्याला ‘ओम शांति ओम’मध्ये नकारात्मक भूमिका मिळाली. या चित्रपटानेही चांगली कामगिरी केली.
हेही वाचा – एकाच मालिकेतील तिसरी अभिनेत्री झाली आई, तिघींच्याही घरी मुलींचा जन्म, पोस्ट शेअर करून दिली आनंदाची बातमी
अर्जुनला मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार
अर्जुन रामपालच्या करिअरमधील टर्निंग पॉइंट २००८ हे वर्ष ठरलं. त्याला ‘रॉक ऑन’ चित्रपट मिळाला. यात तो सहाय्यक भूमिकेत होता. याच सिनेमासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मात्र, काही वर्षांनी अर्जुनच्या करिअरला उतरती कळा लागली आणि त्याचे चित्रपट पाठोपाठ फ्लॉप होऊ लागले.
हेही वाचा – माधुरी दीक्षित व गौरी खानने शेअर मार्केटमध्ये केली गुंतवणूक, कोणत्या कंपनीचे शेअर्स घेतले? वाचा
तब्बल १४ चित्रपट झालेले फ्लॉप
‘डॉन’आधी अर्जुनचे तब्बल १४ चित्रपट फ्लॉप झाले होते, पण त्याने न खचता काम करणं सुरू ठेवलं. अर्जुन अखेरचा २०२४ मध्ये ‘क्रॅक’ या चित्रपटात झळकला होता. सध्या तो त्याच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.
© IE Online Media Services (P) Ltd