अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी अष्टपैलू भारतीय अभिनेत्यांपैकी एक आहे. नवाजुद्दीन सिद्दिकीनं विविध भूमिका साकारत वेळोवेळी स्वत:ला सिद्ध केलं आहे. अनेकांना नवाजुद्दीन आकर्षक वाटत नाही आणि आता त्याला स्वत:लादेखील ते खरं वाटतं, असं नवाजुद्दीननं एका मुलाखतीत सांगितलं. तसंच बॉलीवूडमध्ये असलेलं वर्णभेदाचं वातावरण आणि चुकीची वागणूक याबद्दलही त्यानं भाष्य केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘न्यूज १८’ला दिलेल्या मुलाखतीत नवाजुद्दीन म्हणाला, “आपल्या इथे काही लोक माझ्या दिसण्याचा इतका तिरस्कार का करतात हेच मला कळत नाही. कदाचित मी तेवढाच कुरूप आहे. जेव्हा मी स्वत:ला आरशात पाहतो तेव्हा मला हे जाणवलं आहे. मी एवढा कुरूप चेहरा घेऊन या फिल्म इंडस्ट्रीमध्ये का आलो आहे, असा प्रश्नदेखील मला पडतो.”

हेही वाचा… ‘नखरेवाली’ चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित, ‘गुलाबी साडी’ गाण्याशी आहे खास कनेक्शन?

नवाजुद्दीन पुढे म्हणाला, “माझा या गोष्टीवर विश्वास आहे की, मी शारीरिकदृष्ट्या चित्रपटसृष्टीतील सर्वांत कुरूप अभिनेता आहे. कारण- सुरुवातीपासून मी हे ऐकत आलोय आणि आता माझा त्यावर विश्वास बसू लागला आहे.”

मात्र, इंडस्ट्रीत भेदभाव असतानाही नवाजुद्दीन सिद्दिकीला कायम चांगलं काम मिळत राहिल्याचंही त्यानं सांगितलं. तो म्हणाला, “फिल्म इंडस्ट्रीकडून मला कोणतीच तक्रार नाही आहे. मला वेगवेगळ्या भूमिका दिल्याबद्दल मी सगळ्या दिग्दर्शकांचे आभार मानतो. जर तुमच्याकडे थोडाफार जरी टॅलेंट असेल तरी इंडस्ट्री आपल्याला खूप काही देते. समाजात भेदभाव आहे; पण इंडस्ट्रीत नाही.”

हेही वाचा… “…घाबरून चालणार नाही”, हिना खानने शेअर केली तिच्या ‘कर्करोगाचा प्रवास’ सांगणारी पोस्ट , म्हणाली…

दरम्यान, नवाजुद्दीन सिद्दिकीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, आनंद सुरापूर दिग्दर्शित ‘रौतू का राज’ चित्रपटात नवाजुद्दीन प्रमुख भूमिकेत झळकला होता. हा चित्रपट २८ जून रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात नवाजुद्दीनबरोबर नारायणी शास्त्री, राजेश कुमार, अतुल तिवारी यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. तर, गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘हड्डी’, ‘टिकू वेड्स शेरू’, ‘जोगिरा सारा रा रा’ या चित्रपटांमध्ये नवाजुद्दीन झळकला होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This famous actor on racism in bollywood industry calls him ugly dvr