बॉलीवूड स्टार कार्तिक आर्यननं कोणत्याही गॉडफादरशिवाय सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. कॉलेजमध्ये असताना या अभिनेत्यानं अनेक ऑडिशन्स दिल्या. अभियांत्रिकीची पदवी घेत असताना, त्यानं लव रंजनच्या ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटातून सिनेसृ्ष्टीत पदार्पण केलं. २०१८ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटामुळे तो प्रसिद्धीझोतात आला.

कार्तिकनं मनोरंजनसृष्टीत ओळख नसतानाही प्रेक्षकांच्या मनात त्याचं एक वेगळं स्थान निर्माण केलंय. कार्तिक अभिनीत एका चित्रपटाला जेव्हा आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता तेव्हा त्यानं त्या चित्रपटात नि:शुल्क काम केलं होतं. त्याबद्दल नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यानं सांगितलं आहे.

Sameera Reddy on breast enhancement surgery
“स्तनांचा आकार वाढविण्यासाठी दबाव…”, बॉलीवूड अभिनेत्रीचा खुलासा; म्हणाली, “मी खऱ्या आयुष्यात…”
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
What Kiran mane Said About Ketki Chitale?
केतकी चितळेला किरण मानेंचा सवाल, “अभिमानाने ‘चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण’ जात सांगणारी ताई आता हिंदू..”
heeramandi fame actress sanjeeda shaikh opens up on woman groped her
“माझ्या स्तनांना स्पर्श केला अन्…” ‘हीरामंडी’ फेम अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग, म्हणाली, “या घटनेमुळे…”
Shatrughan Sinha reacts on Sonakshi Sinha zaheer iqbal wedding
सोनाक्षी सिन्हा-झहीर इक्बालच्या लग्नाबद्दल शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, “आजकालची मुलं आई-वडिलांची…”
Pune hotel menu card viral on social media punekar swag puneri pati viral
पुणे तिथे काय उणे! हॉटेलच्या मेन्यू कार्डवर महिलांसाठी सूचना; वाचून म्हणाल “पुणेकरांना एवढा कॉन्फिडन्स येतो तरी कठून?”
Aamir khan rejected a film offer given by mahesh kothare
आमिर खानने नाकारला होता महेश कोठारेंचा ‘हा’ चित्रपट, किस्सा सांगत म्हणाले, “माझ्या डोक्यात वेड्यासारखा विचार…”
Nagpur Results Nitin Gadkari Major Win Can Change Prime Minister Power Game
नितीन गडकरींचा विजय पालटणार सत्तेचा खेळ? ज्योतिषतज्ज्ञ म्हणतायत, “२०२४ पर्यंत काळजी, तर २०२६ ला मोठा..”

हेही वाचा… ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम ईशा केसकरने ‘पुष्पा-२’ च्या गाण्यात आणला ट्विस्ट, डान्स व्हिडीओ व्हायरल

‘शोशा’ला दिलेल्या एका मुलाखतीत, कार्तिकनं उघड केलं की, गेल्या वर्षीचा ॲक्शन कॉमेडी चित्रपट ‘शहजादा’ जेव्हा आर्थिक संकटाचा सामना करीत होता तेव्हा त्यानं त्याचं मानधन सोडण्याचा निर्णय घेतला. रोहित धवन यांनी दिग्दर्शत केलेल्या या चित्रपटासाठी त्याला निर्मात्याचं श्रेय देण्यात आलं होतं. कार्तिक म्हणाला, “मला निर्मात्याचं श्रेय मिळालं. कारण- मी माझं मानधन घेतलं नव्हतं. मी हे केलं जेव्हा याबद्दल कोणीच बोलत नव्हतं. त्यांच्या आर्थिक कमतरतेमुळे मी माझं मानधन सोडून दिलं. याबद्दल कोणीही लिहीत नाही. हे फक्त मी नाही, तर अनेक कलाकार करतात. बहुधा यापेक्षा अधिक करतात. हे खूप सोपं गणित आहे. दिग्दर्शक, अभिनेता आणि निर्मात्यापासून सगळ्यांनाच वाटत असतं की, आपला चित्रपट यशस्वी व्हावा. कोणालाही असं नाही वाटत की, मी माझं मानधन घेणार; चित्रपट खड्ड्यात गेला तरी चालेलं.”

हेही वाचा… ‘पारू’ फेम शरयू आणि पूर्वा पुन्हा एकदा थिरकल्या ‘पुष्पा-२’च्या गाण्यावर, VIDEO व्हायरल

‘शहजादा’चे निर्माते भूषण कुमार यांनीही यापूर्वी कार्तिक आर्यनचं कौतुक केलं होतं आणि सांगितलं होतं की, कार्तिक आर्यननं त्यांच्या वाईट काळात टीमला सपोर्ट केला आणि मानधन न घेता, तो त्यांच्या पाठीशी उभा राहिला.

हेही वाचा… “ती खासदारच नाही पण…”, कंगना रणौतच्या श्रीमुखात देणाऱ्या कॉन्स्टेबलची अनुपम खेर यंनी केली कानउघडणी, म्हणाले…

दरम्यान, कार्तिक आर्यनच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, कार्तिक शेवटचा सत्य प्रेम की कथा या चित्रपटात झळकला होता. कार्तिकचा ‘चंदू चॅम्पियन’ हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर, ‘भूल भुल्लैया-३’ मध्येदेखील कार्तिक प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.