चित्रपट कसाही असला तरी त्या चित्रपटाचं यश हे बॉक्स ऑफिसवरील आकड्यांवर ठरलेलं असतं. काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करतात तर काही चित्रपट हे सपशेल आपटतात. बॉलिवूडमध्येही असे कित्येक चित्रपट आहेत जे बॉक्स ऑफिसवर दणकून आपटले आहेत अन् ज्याचा निर्मात्यांना जबरदस्त फटकाही बसला आहे. पण आज आपण बॉलिवूडच्या सर्वात मोठ्या फ्लॉप चित्रपटाबद्दल जाणून घेणार आहोत.

या चित्रपटात निर्मात्यांनी अक्षरशः पाण्यासारखा पैसा ओतला पण अखेर प्रदर्शनानंतर चित्रपट सपशेल आपटला. १५ वर्षांपूर्वी हा बिग बजेट चित्रपट प्रदर्शित झाला खरा पण चित्रपटगृहात मात्र तो फारकाळ टिकूही शकला नाही. २००९ साली आलेल्या अक्षय कुमार, संजय दत्त व झायेद खान यांच्या ‘ब्ल्यु’ या चित्रपटाबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत. मनोरंजनसृष्टीतील हा आजवरचा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट ठरला आहे.

grand alliance government accelerate the shaktipeeth highway work after election victory
निवडणुकीत प्रचंड बहुमत… आता महायुती सरकारकडून शक्तिपीठ महामार्गाला गती?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
bmc fixed deposits reduce by 10 thousand crore in current financial year
मुदतठेवींमध्ये १० हजार कोटींची घट; पालिकेचा राखीव निधी ९१ हजार कोटींवरून ८१ हजार कोटींवर
Mahakumbh mela 2025
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभमुळे मिळणार २००० कोटींची आर्थिक चालना; अर्थव्यवस्था काय सांगते?
portfolio, investment , Alphaportfolio Concept ,
चला अल्फापोर्टफोलिओ तयार करूया
Mumbai Municipal Corporation owes Rs 16500 crore to the government mumbai news
सरकारकडे मुंबई पालिकेचे साडेसोळा हजार कोटी थकीत; सहाय्यक अनुदान, पाणीपट्टी, मालमत्ता कराचा समावेश
ruhcir sharma
२०२५ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कशी असेल?
Budget Out of 36 thousand crores, only 18 thousand crores were spent Mumbai news
अर्थसंकल्पाचा फुगवटा यंदाही कायम? ३६ हजार कोटींपैकी केवळ १८ हजार कोटीच खर्च

आणखी वाचा : “कृपया गाऊ नकोस…” पहिल्याच लाइव्ह परफॉर्मन्सनंतर प्रेक्षकांनी परिणीती चोप्राला केलं ट्रोल

त्यावेळी अक्षय कुमारचं फिल्मी करिअर हे एका उंचीवर होतं, त्यामुळे ‘ब्ल्यु’च्या ट्रेलरनंतर याची प्रचंड हवा निर्माण झाली. परदेशातील लोकेशन्स आणि दमदार अॅक्शन असूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला. समुद्रात बुडालेल्या एका जुन्या जहाजातील खजिन्याभोवती फिरणाऱ्या या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना अजिबात आवडली नाही.

मीडिया रीपोर्टनुसार या चित्रपटाचे बजेट होते ८५ कोटी. अक्षय कुमार, संजय दत्तसारखी मोठमोठी नावं जोडलेली असूनसुद्धा या चित्रपटाने जगभरात केवळ ६३ कोटींचा व्यवसाय केला. आपल्या बजेटएवढी रक्कमही वसूल न केल्यामुले बॉलिवूडचा हा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट ठरला. याच चित्रपटानंतर अभिनेता झायेद खानच्या करिअरला उतरती कळा लागली अन् चित्रपटसृष्टीतून तो दिसेनासा झाला.

Story img Loader