रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ने पहिल्याच दिवसापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ६१ कोटींची छप्परफाड कमाई करत शाहरुख खानच्या ‘पठाण’ला मागे टाकलं आहे. या चित्रपटात बराच रक्तपात, हिंसा, बोल्ड सीन्स असल्याने याला ए सर्टिफिकेट देण्यात आलं आहे. याबरोबरच चित्रपटाला जेवढं प्रेम मिळत आहे तितकीच यावर टीकाही होताना दिसत आहे.

संदीप यांनी सांगितल्याप्रमाणे ‘कबीर सिंह’पेक्षा या चित्रपटावर लोक अधिक टीका करताना दिसत आहे. चित्रपटातील बरेच सीन्स, डायलॉग, हिंसाचार यावर काही लोकांनी आक्षेप घेतला आहे. संदीप यांनी जाणूनबुजून या चित्रपटात काही गोष्टी दाखवल्या आहेत ज्या लोकांना खटकल्या आहेत. खासकरून चित्रपटातील हे मोजके तीन सीन्स असे आहेते जे पाहताना प्रेक्षकांना फार किळस आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. हे प्रॉब्लेमॅटीक सीन्स नेमके कोणते ते आपण जाणून घेऊया.

High Court orders Mumbai Police regarding atrocity case against Nawab Malik Mumbai news
मलिक यांच्याविरोधातील ॲट्रोसिटी प्रकरणाचा तपास चार आठवड्यांत पूर्ण करा; उच्च न्यायालयाचे मुंबई पोलिसांना आदेश
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
atul subhash
Atul Subhash Suicide Case : अतुल सुभाषच्या सासू आणि मेव्हण्याने केलं पलायन; पोलीस म्हणतात, “त्यांना नजरकैदेत…”
evm scam india alliance
ईव्हीएमचा वाद पुन्हा सर्वोच्च न्यायालयात! ‘इंडिया’आघाडी याचिका दाखल करण्याची शक्यता
Bajrang Sonwane meets Amit Shah
“बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी”; शरद पवारांचा खासदार थेट अमित शाहांना भेटला
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड

१. पौरुषत्वाचं लिंगाशी कनेक्शन:

चित्रपटात बऱ्याच सीन्समधून पौरुषत्व आणि माणसाचं लिंग यांचा उल्लेख केला गेल्याचं दिसत आहे. रणबीरचं पात्र जेव्हा अमेरिकेतून भारतात येतं तेव्हा खराब अंतरवस्त्र परिधान करावी लागल्याने त्याच्या प्रायव्हेट पार्टवर चट्टे उठतात अन् त्याचा त्याला त्रास होताना आणि त्याबद्दल उघडपणे बोलताना दाखवलं आहे.

आणखी वाचा : Animal Review: वडील-मुलाच्या विचित्र नात्याची, आजवर कधीही न ऐकलेली अन् पाहिलेली अस्वस्थ करणारी ‘हिंसक’ गोष्ट

त्यानंतर एका भयानक अपघातादरम्यान तो जखमी होतो त्यावेळीही त्याच्या लिंगाबद्दल असेच काही संवाद ऐकायला मिळतात. तसेच जेव्हा तो बरा होतो तेव्हा नग्न अवस्थेत फिरणं, आजारातून उठल्यावर लगेच दुसऱ्या स्त्रीबरोबर सेक्स करणं अशा बऱ्याच प्रॉब्लेमॅटीक गोष्टींचा पौरुषत्वाशी थेट किंवा अप्रत्यक्षपणे संबंध जोडण्यात आला असल्याचं काहींनी स्पष्ट केलं आहे.

२. महिलेबरोबरचा ‘हिंसक’ रोमान्स :

प्रेमात पडलेल्या दोन व्यक्ती एकमेकांना मारू शकतात अन् त्यात काहीही गैर नाही असं मत मांडणारे संदीप रेड्डी वांगा यांनी ‘अ‍ॅनिमल’मध्येही ही गोष्ट अधोरेखित करायचा प्रयत्न केला आहे. एका सीनमध्ये रणबीर आणि रश्मिकामध्ये कडाक्याचं भाडण होतं अन् त्यानंतर रणबीर तिला म्हणतो की पहिले मी तुला थोबाडीत मारेन अन् फार जोरात मारेन, त्यावर रश्मिकाही त्याला त्याच भाषेत उत्तर देते. एकूणच प्रेमाची व्याख्या आणि महिलांच्या बाबतीतला हा हिंसक रोमान्स बऱ्याच प्रेक्षकांच्या आकलनशक्तीच्या पलीकडचा आहे अन् यामुळेच यावर टीका होताना दिसत आहे.

३. बॉबी देओलचे किळसवाणे रूप :

चित्रपटात बॉबी देओल हा मुख्य खलनायक असला तरी यात त्याल मोजून ३ सीन्स देण्यात आले आहेत अन् त्या तीनही सीन्समध्ये बॉबीने उत्कृष्ट काम केलं आहे. बॉबीच्या पात्राची सुरुवातच त्याच्या लग्नाच्या दिवसापासून होते जेव्हा तो भर लग्नात एका माणसाचा अत्यंत क्रूरपणे जीव घेतो अन् त्यानंतर तिथेच उपस्थित असलेल्या पाहुण्यांसमोर आपल्या पत्नीबरोबर सेक्स करायला सुरुवात करतो, चित्रपटात बॉबी देओलच्या तीन बायका आहेत अन् त्यांचा लैंगिक छळ करताना बॉबीला दाखवलं आहे. हे सीन्स पाहताना प्रेक्षकांना प्रचंड किळस आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

या तीन सीन्सशिवाय इतरही बऱ्याच सीन्समध्ये खून, रक्तपात, बोल्ड सेक्स सीन्स, किसिंग सीन्सचा भडिमार आहे. याच काही सीन्समुळे चित्रपटावर प्रचंड टीका होताना आपल्याला दिसत आहे. ‘अ‍ॅनिमल’मध्ये रणबीरसह रश्मिका मंदाना, अनिल कपूर, शक्ति कपूर, बॉबी देओल, तृप्ती डीमरी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Story img Loader