Tiger 3 Movie Trailer : सलमान खान, कतरिना कैफ आणि इम्रान हाश्मी यांच्या मुख्य भूमिका असलेला बहुचर्चित ‘टायगर ३’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. ‘टायगर ३’ चित्रपट यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्सचा एक भाग आहे. ‘टायगर’ आणि ‘झोया’च्या प्रेमकहाणी २०१२ पासून सुरूवात झाली. पुढे, २०१७ मध्ये ‘टायगर जिंदा है’च्या रुपात या सीरिजचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला. आता भाईजानच्या चाहत्यांमध्ये तिसऱ्या भागाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

हेही वाचा : “त्याने चुकीच्या पद्धतीने हात लावला…”, मराठी अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव; म्हणाली, “त्या क्षणी…”

raveena tandon on saif ali khan attacked
सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर रवीना टंडनने वांद्रे परिसरातील सुरक्षेवर व्यक्त केली चिंता; म्हणाली, “सेलिब्रिटींना टार्गेट…”
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Alone tiger attacks a herd of wild gaur
‘जेव्हा वाघ जगण्यासाठी झटतो…’ एकट्या वाघाचा रानगव्याच्या कळपावर हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Chandrapur District , Junona Ballarpur route, tiger ,
VIDEO : जेव्हा जंगलाचा राजा आला रस्त्यावर…
nylon manja news in marathi
अकोल्यात नायलॉन मांजामुळे डोळाच धोक्यात… प्रशासनाच्या नाकावर टिच्चून…
Tharla Tar Mag Fame Actors Dance Video
“मुझको क्या हुआ है…”, ‘ठरलं तर मग’ फेम चैतन्य अन् कुसुमचा शाहरुख खानच्या गाण्यावर जबरदस्त डान्स! कमेंट्सचा पाऊस…
tripti dimri aashiquie 3 exit anurag basu
बोल्ड भूमिकांमुळे तृप्ती डिमरीचा Aashiqui 3 मधून पत्ता कट? दिग्दर्शक प्रतिक्रिया देत म्हणाला, “तिलाही हे…”

सलमानच्या ‘टायगर ३’ मध्ये यंदा इम्रान हाश्मी खलनायकाची भूमिका साकारणार आहे. त्याच्या ‘वेलकम टू पाकिस्तान टायगर’ या डायलॉगमुळे इम्रान पाकिस्तानशी संबंध असल्याचा अंदाज ट्रेलर पाहून येतो. बॉलीवूडचा भाईजान चित्रपटामध्ये जबरदस्त अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. टायगर सीरिजमध्ये सलमानप्रमाणे कतरिना साकारत असलेलं झोया हे पात्रदेखील अतिशय हुशार आणि गुंडांशी दोन हात करताना दाखवण्यात आलं आहे. आता ‘टायगर ३’मध्ये सुद्धा प्रेक्षकांना कतरिनाची जबरदस्त अ‍ॅक्शन पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा : “विकीने मला विकले अन्…” अंकिता जैन बिग बॉसमध्ये पतीबद्दल असं का म्हणाली? जाणून घ्या

कतरिना कैफ साकारत असलेली झोया ही मूळची पाकिस्तानी गुप्तहेर असते. ‘टायगर ३’मध्ये सुद्धा झोया टायगरच्या साथीने खतरनाक अ‍ॅक्शन करताना दिसेल. कतरिनाचा ट्रेलरमधील एक सीन विशेष लक्ष वेधून घेतो. या सीनमध्ये कतरिनाने फक्त टॉवेल गुंडाळून शत्रूशी दोन हात केल्याचं पाहायला मिळत आहे. कतरिनाचा हा टॉवेल सीन सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हेही वाचा : ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटाची २५ वर्ष! करण जोहरच्या भावुक पोस्टवर मराठी अभिनेत्याची कमेंट; म्हणाला, “राहुल-अंजली नसते तर…”

कतरिनाने टॉवेल गुंडाळून केलेल्या या जबरदस्त अ‍ॅक्शन सीनवर नेटकऱ्यांनी एक्सवर (आधीचे ट्विटर) प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली आहे. एका युजरने, “भारतीय कौटुंबिक सिनेमासाठी एवढा बोल्ड सीन देण्याची गरज नव्हती”, तर दुसऱ्या एका युजरने, “टॉवेल पाहून थोड्यावेळासाठी आम्ही घाबरलो.” याउलट कतरिनाच्या काही चाहत्यांनी तिच्या सीनचं समर्थन करत, “कतरिनाला आणि यशराज फिल्म्सला सलाम आहे” अशा कमेंट्स केल्या आहे. दरम्यान, १२ नोव्हेंबरला सलमान खान देशाल वाचवणार की कुटुंबाला याचा उलगडा होणार असून ‘टायगर ३’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story img Loader