अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ सोशल मीडियावर रोज नवनवीन व्हिडीओज शेअर करून आपला आगामी चित्रपट ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसतात. दोन्ही अभिनेत्यांचे हे व्हिडीओज इंटरनेटवर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरलही होतात. त्यात आज १ एप्रिल म्हणजेच ‘एप्रिल फूल’. अशातच टायगरने अक्षय कुमारसाठी चांगल्या प्रॅंकचं नियोजन केलं आणि अक्षयला खूप मोठा ‘एप्रिल फूल’ केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हिडीओत व्हॉलीबॉल गेम सुरू करण्याच्या आधी टायगर एका कोल्ड ड्रिंकच्या बाटलीला जोरात हलवून ती ठेवून देतो आणि सगळ्यांना खेळायला बोलावतो. अक्षयची एन्ट्री होताच टायगर त्याला ती बाटली उघडून द्यायला सांगतो. बाटली उघडताच कोल्ड ड्रिंकमध्ये जमा झालेला फेस अक्षयच्या तोंडावर उडतो. नंतर अक्षय हसत हसत सगळ्यांवर कोल्ड ड्रिंक उडवतो. या प्रॅंकला ‘एप्रिल फूल’चं गाणं जोडत टायगरनं अक्षयला चांगलंच ‘फूल’ बनवल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळतंय. “एप्रिल फूल बडे मियाँ” असं कॅप्शन या व्हिडीओला टायगरनं दिलं आहे.

टायगर आणि अक्षयचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स करीत आपल्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत. ‘खिलाडीबरोबरच खिलवाड’, ‘छोटे मियाँनं बदला घेतला’ अशा अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

हेही वाचा… पूजा हेगडे रोहन मेहराला करतेय डेट? अभिनेत्रीचा कथित बॉयफ्रेंडबरोबरचा व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चित्रपटाबद्दल सांगायचं झालं, तरं हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर म्हणजेच १० एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. या अॅक्शन थ्रिलर चित्रपटात अक्षय आणि टायगरबरोबरच पृथ्वीराज सुकुमारन, सोनाक्षी सिन्हा, मानुषी छिल्लर, अलाया फर्निचरवाला, रोनित रॉय यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tiger shroff april fooled akshay kumar by spilling cold drink on akshay dvr