अभिनेता टायगर श्रॉफ त्याच्या अॅक्शन आणि स्टंट्ससाठी ओळखला जातो. त्याच्या चित्रपटातील अॅक्शनचे प्रेक्षक प्रचंड चाहते आहेत. टायगरही अनेकदा वेगवेगळे स्टंट्स करतानाचे व्हिडीओ चाहत्यांशी शेअर करत असतो. आता नुकताच त्याने एक वॉशबेसिन तोडतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. पण हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना टायगरची काळजी वाटू लागली आहे. कारण हा सीन करताना त्याच्या पायला दुखापत झाली आहे.

आणखी वाचा : कतरिना कैफच्या आगामी ‘मेरी ख्रिसमस’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली, ‘या’ भीतीमुळे निर्मात्यांनी घेतला निर्णय

A Heart-Touching Reunion of two friends
Video : “ही दोस्ती तुटायची नाय” भांडण मिटल्यावर दोघी मैत्रीणी ढसा ढसा रडल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “म्हणून मैत्रीत गैरसमज नसावे”
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Ram Kapoor Body Transformation
राम कपूर यांनी वजन कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया केली का? व्हिडीओ शेअर करीत स्वत: केला खुलासा
Sonu Nigam
लाईव्ह शोमध्ये सोनू निगमच्या पाठीत सुरू झाल्या वेदना; व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “आयुष्यातील सर्वात कठीण…”
Mumbai young boys present amazing lavani dance
Video : मुंबईच्या तरुणांनी मरीन ड्राइव्ह येथे सादर केली भन्नाट लावणी, व्हिडीओ पाहून गौतमी पाटीलला विसराल!
Amruta Khanvilkar Health Update
Video : हाताला झालेल्या दुखापतीनंतर अमृता खानविलकरने दिले आरोग्याविषयीचे अपडेट्स; म्हणाली, “दोन महिन्यांनंतर…”, पाहा व्हिडीओ
dada kondke
Video : “हाडाचा कलाकार आहे भाऊ! रडला पण डान्स नाही विसरला”; दादा कोंडके स्टाईल चिमुकल्याचा डान्स पाहून पोट धरून हसाल
remo dsouza attend mahakumbh mela
Video : जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर चेहरा लपवून महाकुंभमेळ्याला पोहोचला अन्…; बॉलीवूड कोरिओग्राफरचा व्हिडीओ व्हायरल

अभिनेता टायगर श्रॉफने त्याच्या इन्स्टाग्रामवर त्याचा एक अॅक्शन सीन करतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत तो गुंडांशी दोन हात करताना दिसत आहे. यादरम्यान एका गुंडला मारताना टायगरला त्याच्या लाथेने बेसिन फोडायचे होते. ते त्याने फोडलेही पण ते करताना त्याचा पायही तुटला. हा व्हिडीओ पोस्ट करत त्याने म्हटले, “काँक्रीटचे वॉश बेसिन फोडताना माझा पाय मोडला कारण मला वाटले की मी आधीपेक्षा अधिक ताकदवान आहे. पण मी मारल्याने ते बेसिनही तुटले.” सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून अनेकांनी त्याला त्याला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीनेही त्याच्या व्हिडिओवर कमेंट करत ‘ओ माय गॉड’ असे म्हटले आहे. तर दिग्दर्शक साबीर खान यानेही या व्हिडिओवर कमेंट केली आहे. त्याने असे म्हटले आहे की, ‘हा त्या दिवशीचा व्हिडिओ आहे ज्यावेळी आम्ही २४ तास सलग शूट केले.”

हेही वाचा : गोविंदाच्या ‘हिरो नंबर १’ या सुपरहिट चित्रपटाचा येणार रिमेक, ‘हा’ अभिनेता साकारणार प्रमुख भूमिका

टायगर श्रॉफ शेवटचा अॅक्शन पॅक्ड फिल्म ‘हिरोपंती २’ मध्ये दिसला होता. त्यानंतर त्याच्या आगामी चित्रपटांची यादी हळूहळू वाढत चालली आहे. ‘गणपत’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट या वर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात टायगर श्रॉफ अभिनेत्री क्रिती सेनॉन जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार आहे. यंदाच्या ख्रिसमसच्या मुहूर्तावर ‘गणपत’ हा चित्रपट अनेक मोठ्या चित्रपटांना टक्कर देताना दिसणार आहे. याशिवाय टायगर अक्षय कुमारसोबत ‘पेंच ढीला’ आणि ‘बडे मियाँ छोटे मियाँ’मध्ये दिसणार आहे.

Story img Loader