टायगर श्रॉफ, क्रिती सेनॉन व अमिताभ बच्चन यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘गणपत’ चित्रपट मागच्या शुक्रवारी म्हणजेच २० ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला होता. चित्रपट प्रदर्शित होऊन आठवडा झाला आहे, पण तो बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांची मनं जिंकण्यात अपयशी ठरला आहे. चित्रपटाच्या कमाईचे आकडे खूपच निराशाजनक आहेत. अवघ्या एका आठवड्यात ‘गणपत’ने बॉक्स ऑफिसवरून गाशा गुंडाळला आहे.

“हे पटत नाहीये…” निवेदिता सराफ यांनी नाट्यगृहांबद्दल केलेल्या ‘त्या’ विधानावर विशाखा सुभेदारचं स्पष्ट मत; म्हणाली, “पूर्वीचा…”

गणपतने पहिल्या दिवशी २.५ कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी २.२५ कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी २.२५ कोटी रुपये, चौथ्या दिवशी १.३ कोटी रुपये, पाचव्या दिवशी १.५ कोटी रुपये, सहाव्या दिवशी १.१० कोटी रुपये कमावले आहेत. आता सातव्या दिवसाची आकडेवारी समोर आली आहे. जी आधीच्या सहा दिवसांपेक्षा फार कमी आहे. सातव्या दिवशी या सिनेमाने फक्त १ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. २०० कोटींचं बजेट असलेल्या सिनेमाचं एकूण कलेक्शन ११.९० कोटी रुपये झालं आहे.

“हे नवरे लोक फोटोत…”, हेमांगी कवीच्या ‘त्या’ कमेंटवर वनिता खरातच्या नवऱ्याने दिलं उत्तर; म्हणाला, “मी मनात…”

आज कंगना रणौतचा ‘तेजस’ सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे ‘गणपत’च्या कमाईत विकेंडला वाढ होण्याची शक्यता कमी झाली आहे. ‘गणपत’ फ्लॉप झाल्याने क्रितीच्या नावावर आणखी एका फ्लॉप चित्रपटाची नोंद झाली आहे. ‘पानिपत’, ‘बच्चन पांडे’, ‘शेहजादा’, ‘अर्जुन पटियाला’ आणि ‘आदिपुरुष’ या पाच फ्लॉपनंतर आता ‘गणपत’देखील या यादीत आला आहे.