टायगर श्रॉफचा ‘गणपत’ चित्रपट काल २० ऑक्टोबरला प्रदर्शित झाला. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला होता. या ट्रेलरमध्ये टायगर श्रॉफचे अॅक्शन सीन्स पहायला मिळाले होते. ट्रेलरनंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुक्ता निर्माण झाली होती. मात्र, प्रदर्शनानंतर ‘गणपत’ची जादू फिकी पडल्याचे दिसून येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- “जर माझ्या मुलीचा जन्म गाझामध्ये झाला असता तर…” स्वरा भास्करच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष

‘सॅकनिल्क’च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘गणपत’ चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ २.५० कोटींची कमाई केली आहे. ‘गणपत’ चित्रपटात क्रिती सेनॉन आणि अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटात टायगर श्रॉफबरोबर क्रिती सेनॉनही अॅक्शन सीन्स करताना दिसत आहे. या चित्रपटाची वाशू भगनानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख आणि विकास बहल यांनी निर्मिती केली आहे. हा चित्रपट जगभरात हिंदीसह तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित झाला आहे.

‘गणपत’च्या पहिल्या दिवसाच्या कमाईने सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे. हा चित्रपट टायगरच्या करिअरमधील आतापर्यंतचा सर्वात कमी ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे. यापूर्वी टायगरच्या सगळ्याच चित्रपटांनी पहिल्या दिवशी चांगली कमाई केली होती. टायगरचा ‘हिरोपंती २’ ची पहिल्या दिवशीची कमाई ६.५० कोटी रुपये होती. तर ‘बागी ३’ ने १७ कोटींचा गल्ला जमवला होता. ‘वॉर’ने पहिल्या दिवशी ५३.३५ कोटींचा व्यवसाय केला होता, तर ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ने १२.०६ कोटींची कमाई केली होती.