‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मधील नेत्रा अर्थात अभिनेत्री तितीक्षा तावडे काही दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकली. २६ फेब्रुवारीला तिने अभिनेता सिद्धार्थ बोडकेबरोबर लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. लग्नाच्या सात दिवसांनी अभिनेत्री कामाला लागली आहे. ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’च्या सेटवर तितीक्षाचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर आता अभिनेत्रीचा नवरा सिद्धार्थ बोडके बॉलीवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर झळकणार आहे. याचा व्हिडीओ नुकताच समोर आला आहे.

अभिनेता सिद्धार्थ बोडकेने याआधी हिंदी मालिका व चित्रपटांमध्ये काम केलं आहे. या मालिका व चित्रपटांमधील त्याच्या भूमिका हिट झाल्या आहेत. आता तो बॉलीवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीसह काम करताना दिसणार आहे. याचा व्हिडीओ बॉलीवूडच्या त्या अभिनेत्री सोशल मीडियावर शेअर केला असून व्हायरल झाला आहे.

Maharashtrachi Hasyajatra Fame prithvik Pratap share funny video with wife
Video: पृथ्वीक प्रतापला बायकोला खोचकपणे मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणं पडलं महागात, प्राजक्ताने थेट…; पाहा मजेशीर व्हिडीओ
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
aadar jain alekha advani wedding videos
३ वर्षे बॉलीवूड अभिनेत्रीला केलं डेट, ब्रेकअपनंतर तिच्याच मैत्रिणीबरोबर थाटला संसार; अभिनेत्याच्या लग्नातील Video Viral
shradhha kapoor boyfriend
श्रद्धा कपूरच्या मोबाईल वॉलपेपरवरील ‘ती’ व्यक्ती कोण? व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण
Lagira Zhala Ji fame kiran dhane appear in Ude Ga Ambe serial
Video: ‘लाागिरं झालं जी’मधील जयडी आली परत, ‘स्टार प्रवाह’च्या ‘या’ लोकप्रिय मालिकेत झळकणार
Constable Manju Fame Marathi Actor Wedding
‘कॉन्स्टेबल मंजू’ फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात! पत्नी देखील आहे अभिनेत्री, ‘या’ मालिकेत केलंय काम, लग्नातील फोटो आले समोर
khushi and janhvi kapoor dance with boney kapoor
Video: श्रीदेवींचे पती बोनी कपूर यांचा लेकींबरोबरचा मजेशीर अंदाज पाहिलात का? व्हिडीओ होतोय व्हायरल
Lakhat Ek Aamcha Dada
Video : महेश जाधवचा अभिनेत्रीबरोबर जबरदस्त डान्स; जुई तनपुरे व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “आमचा मावळा…”

हेही वाचा – Video: “फोन बंद कर…”, सेल्फी व्हिडीओ करत असलेल्या चाहत्यावर भडकला सलमान खान; व्हिडीओ व्हायरल

सिद्धार्थ काम करत असलेल्या त्या बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचं नाव आहे उर्वशी रौतेला. उर्वशीसह सिद्धार्थ आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात शिव तांडव डान्स आहे. या डान्सच्या चित्रीकरणादरम्यानचा व्हिडीओ उर्वशीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये सिद्धार्थ एका वेगळ्या लूकमध्ये पाहायला मिळत आहे. कपाळाला भस्म, हातात भलामोठा शंख घेऊन अभिनेता दिसत आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या या व्हिडीओला सिद्धार्थने लाइक केलं आहे.

हेही वाचा – Video: एल्विश यादवने युट्यूबर मॅक्सटर्नला केली बेदम मारहाण; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

दरम्यान, लग्नाआधी सिद्धार्थने उर्वशीसह एक फोटो शेअर केला होता. ज्याला त्याने कॅप्शन दिलं होतं, “स्टे ट्यून.” या फोटोवर उर्वशीने “दुल्हे राजा” अशी कमेंट केली होती.

Story img Loader