दाक्षिणात्य अभिनेत्याचं गारुड संपूर्ण देशभरात आहे. बॉलिवूडप्रमाणे दक्षिणेतील अभिनेतेदेखील चर्चेत असतात. त्यांचे चाहतेदेखील त्यांच्या आगामी चित्रपटाची वाट बघत असतात. दक्षिणेतील एका आघाडीचा अभिनेता म्हणजे विजय सेतुपती, त्याने अनेक तामिळ चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. लवकरच आता तो बॉलिवूडच्या चित्रपटात झळकणार आहे. हिंदीत काम करण्यावरून त्याने भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कमल हासन यांच्या ‘विक्रम’ चित्रपटात आपल्या अभिनयनाने प्रेक्षकांची मन जिंकणारा अभिनेता म्हणजे विजय सेतुपती, नुकताच त्याचा ‘फर्जी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ‘फर्जी’ च्या ट्रेलर लाँच दरम्यान, सेतुपतीने हिंदी प्रेक्षकांबद्दलची नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला की, “कोणी मला हिंदी प्रोजेक्ट विषयी विचारले तर मी सांगतो मी शाहिदबरोबर काम करत आहे तेव्हा ती ‘अरे वा’अशी प्रतिक्रिया देतात.”

वर्षाची सुरवात बॉलिवूडसाठी निराशाजनक; अर्जुनच्या ‘कुत्ते’ चित्रपटाने कमावले ‘इतके’ कोटी

विजय पुढे म्हणाला, “म्हणून मला म्हणावं लागतं की मी शाहरुख सरांबरोबर काम करत आहे, मी कतरिना कैफबरोबर काम करत आहे, तरच ते माझा आदर करतात. त्यामुळे मी कोणत्या कलाकाराबरोबर काम करतोय यावर ते अवलंबून आहे.” अशा शब्दात त्याने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

विजयने आजवर अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. शेवटचा तो ‘विक्रम’ चित्रपटात दिसला आहे. शाहिद बरोबर तो ‘फर्जी’ चित्रपटात दिसणार आहे. १० फेब्रुवारीला अ‍ॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे. तसेच तो आता लवकरच शाहरुख खान बरोबर ‘जवान’ या चित्रपटात काम करताना दिसणार आहे. तसेच तो श्रीराम राघवनच्या क्राइम-थ्रिलर ‘मेरी ख्रिसमस’मध्ये कतरिना कैफबरोबर दिसणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tollywood actor vijay setupathi takes dig on hindi audience he said they respect him only when he work with srk and katrina spg
Show comments