Top 10 Highest-paid Actors In India : बॉलीवूड कलाकार, इंडस्ट्रीतील गॉसिप, आघाडीचे अभिनेते, चित्रपटांचं कलेक्शन या सगळ्या गोष्टींची नेहमीच चर्चा सुरू असते. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये साऊथ इंडस्ट्री बॉलीवूडवर भारी पडल्याचं पाहायला मिळत आहे. साऊथ मधल्या कलाकारांची क्रेझ देखील हळुहळू संपूर्ण देशभरात निर्माण होऊ लागली आहे. यामुळेच प्रदर्शनाच्या मार्गावर असलेल्या अनेक चित्रपटांमध्ये दाक्षिणात्य कलाकारांची वर्णी लागल्याचं पाहायला मिळत आहे.

साऊथ इंडस्ट्रीच्या वाढत्या वर्चस्वामुळेच २०२५ मध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या यादीत शाहरुख, सलमान नव्हे तर चक्क दोन दाक्षिणात्य अभिनेत्यांनी बाजी मारली आहे. ‘फोर्ब्स इंडिया’च्या माहितीनुसार भारतात सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांची यादी पाहूयात…

जवळपास ३५० कोटींच्या एकूण संपत्तीसह, अल्लू अर्जुन भारतातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता ठरला आहे. २०२१ मध्ये अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा: द राईज’ सिनेमा प्रचंड गाजला. तर, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा : द रुल – भाग २’ने सुद्धा सगळे रेकॉर्ड्स मोडले. या सिनेमाच्या दुसऱ्या भागासाठी अल्लू अर्जुनने तब्बल ३०० कोटींचं मानधन घेतलं होतं.

अल्लू अर्जुनच्या पाठोपाठ सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांमध्ये दुसरा क्रमांक लागतो जोसेफ विजय चंद्रशेखर, ज्याला थलपती विजय म्हणून देखील ओळखलं जातं. विजय त्याच्या प्रत्येक चित्रपटासाठी अंदाजे १३० ते २७५ कोटी मानधन घेतो.

सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांची यादी, त्यांची नेटवर्थ सुद्धा जाणून घ्या…

क्रमांकअभिनेत्याचं नावचित्रपटांसाठी आकारलेलं मानधन नेट वर्थ
१.अल्लू अर्जुन३०० कोटी३५० कोटी
२.जोसेफ विजय१३० कोटी-२७५ कोटी४७४ कोटी
३.शाहरुख खान१५० कोटी-२५० कोटी६ हजार ३०० कोटी
४.रजनीकांत१२५ कोटी-२७० कोटी४३० कोटी
५.आमिर खान१०० कोटी-२७५कोटी१ हजार ६२ कोटी
६.प्रभास१०० कोटी-२००कोटी२४१ कोटी
७.अजित कुमार१०५ कोटी-१६५ कोटी१९६ कोटी
८.सलमान खान१०० कोटी-१५० कोटी२ हजार ९०० कोटी
९.कमल हासन१०० कोटी-१५० कोटी१५० कोटी
१०.अक्षय कुमार६० कोटी-१४५ कोटी२ हजार ५०० कोटी

दरम्यान, शाहरुख खान सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असला तरीही, सर्वात जास्त संपत्तीचा आकडा किंग खानच्या नावावर आहे. त्याची संपत्ती ६ हजार ३०० कोटी एवढी आहे. तसेच, सर्वाधिक संपत्तीच्या आकडेवारीत शाहरुख पाठोपाठ सलमानचा क्रमांक लागतो. भाईजानची संपत्ती २ हजार ९०० कोटी आहे.