बॉलिवूडचा भाईजान सलमान खान तब्बल ३ वर्षांनी ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. यातील गाणीसुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. याबरोबरच यंदाच्या ‘फिल्मफेअर’ सोहळ्याचं सूत्रसंचालनही सलमानच करणार आहे. यानिमित्त सलमानने नुकतीच एका प्रेस मीटिंगमध्ये हजेरी लावली तेव्हा त्याने कलाकारांच्या मानधनावर भाष्य केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यामध्ये सलमान म्हणाला की ९० चे आम्ही स्टार्स जेवढं मानधन घेतो तेवढंच किंबहुना त्यापेक्षा जास्त मानधन सध्याचे अभिनेते घेत आहेत, तेसुद्धा चित्रपट न चालता. सलमानच्या या वक्तव्यावर नुकतंच चित्रपट समीक्षण तरण आदर्श यांनी भाष्य केलं आहे. सलमानच्या म्हणण्याला दुजोरा देत त्यांनी कलाकारांनी वाढवलेल्या मानधनावरही परखड शब्दांत टीका केली आहे.

आणखी वाचा : “रोमान्स करणारा सलमान मला…” समीक्षक तरण आदर्श यांचं ‘किसी का भाई किसी की जान’बद्दल परखड मत

‘बॉलिवूड हंगामा’शी बोलताना तरण आदर्श म्हणाले, “ही बाब खरी आहे पण आता बऱ्याच कलाकारांनी त्यांच्या मानधनाचा आकडा कमी केल्याचं दिसत आहे. अभिनेते आणि स्टार्सच्या मानधनाच्या आकड्याचा फटका चित्रपटांना बसत आहे. काही कलाकारांना अजूनही ही गोष्ट मान्य करायची नाहीये, काही लोक अजूनही त्यांच्याच विश्वात आहेत. आवाच्या सवा मानधन मागणाऱ्या या कलाकारांना आरसा दाखवणं गरजेचं आहे. चित्रपटाचं त्यांच्यामुळे नुकसान होत आहे याची जाणीव त्यांना व्हायलाच हवी. बरेच कलाकार मानधन न घेता नफ्यात भागीदारी घेत आहे जी गोष्ट चांगली आहे. जर चित्रपट चालला तरच तुम्हाला त्यातला नफा मिळेल. नुकतंच रणबीर कपूरनेही ‘तू झुठी मैं मक्कार’साठी मानधन न घेतल्याचं माझ्या कानावर पडलं आहे. त्याने नफ्यात भागीदारी घेतली आहे की नाही माहीत नाही, पण या गोष्टीची जाणीव प्रत्येक कलाकाराला व्हायला हवी.”

आणखी वाचा : रणवीर सिंगच्या अभिनय कारकिर्दीला लागणार ब्रेक; YRF ने सोडली साथ, अभिनेत्यासह चित्रपट करण्यास नकार

कलाकारांच्या मानधनावरुन याआधीही बऱ्याचदा चर्चा झाल्या आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमार आणि इमरान हाश्मीच्या ‘सेल्फी’ चित्रपटाचं बजेट १७० कोटी होतं आणि चित्रपटाला तेवढे पैसेही वसूल करता आलेले नाहीत. यामागे अक्षय कुमारने आकारलेलं त्याचं मानधन हे महत्त्वाच्या कारणांपैकी एक असल्याचं म्हंटलं जात आहे. अर्थात तरण आदर्श यांनी मुलाखतीत म्हंटल्याप्रमाणे कलाकारांना आरसा दाखवणं, वास्तवाचं दर्शन दाखवणं गरजेचं आहे हेदेखील तितकंच खरं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trade expert and movie critic taran adarsh speaks about huge fees of bollywood stars avn
Show comments