बॉलिवूडमध्ये सध्या रिमेकचे प्रचंड वारे वाहत आहेत. छोट्या मोठ्या कलाकारांपासून बडेबडे सेलिब्रिटीजसुद्धा इतर भाषांमधील चित्रपटांच्या रिमेकमध्ये दिसत आहेत. यापैकी बरेच रिमेक चित्रपट हे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले आहेत तरी बॉलिवूड अजूनही रिमेकचा अट्टहास सोडत नाहीये हे चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रसिद्ध चित्रपट समीक्षक आणि ट्रेड एक्स्पर्ट तरण आदर्श यांनी नुकतंच यावर भाष्य केलं आहे.

‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये तरण आदर्श यांनी हे रिमेक बॉक्स ऑफिसवर अजिबात कमाल दाखवू शकत नसल्याचं निरीक्षण मांडलं. खासकरून आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ आणि त्यानंतर आलेल्या रिमेकबद्दल तरण आदर्श यांनी भाष्य केलं आहे.

Shivsena MLA Arjun Khotkar
Arjun Khotkar : “राजकीय भूकंप काय असतो हे आम्ही दाखवून देऊ”, अर्जुन खोतकरांचं मोठं विधान; कोणाला दिला इशारा?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
sequel of Ghajini film Allu Arvind Aamir khan
‘गजनी’चा सिक्वेल येणार ? ‘तंडेल’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉंच निमित्ताने अल्लू अरविंद आणि आमिर यांची भेट; महत्वाची अपडेट आली समोर. . .
बीड राष्ट्रवादीमध्ये अजितदादांच्या इशाऱ्यानंतर ‘साफसफाई’ होणार का ?
Devotee Angry on yogi adityanath and Narendra modi after stampede in maha kumbha mela
महाकुंभातील भक्त योगी-मोदींवर नाराज का?
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
Dhananjay Munde on Anjali Damania
Dhananjay Munde : अंजली दमानियांनी अजित पवारांची भेट घेतल्यानंतर काय ठरलं? धनंजय मुंडे म्हणाले…
Urvashi Rautela
उर्वशी रौतेलाने ट्रोल करणाऱ्यांना दिलं उत्तर; म्हणाली, “लोक सलमान खान आणि शाहरूख खानला सोडत नाहीत तर…”

आणखी वाचा : शाहरुखने पूर्ण केली कर्करोगाशी झुंजणाऱ्या ६० वर्षीय चाहतीची शेवटची इच्छा; व्हिडीओ कॉल करत दिले सरप्राइज

तरण आदर्श म्हणाले, “सर्वप्रथम मी हात जोडून विनंती करू इच्छितो की कृपया हे रिमेक बनवणं थांबवा. ही गोष्ट सगळ्या अभिनेत्यांना लागू होते. केवळ आमिर खानने हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक केला म्हणून मी त्याबद्दल बोलतोय असं मुळीच नाही. आपल्याकडे दाक्षिणात्य चित्रपटांचे एवढे रिमेक बनत आहेत की ते पाहून आता रिमेक नको हे हात जोडून सांगायची वेळ आली आहे.

आणखी वाचा : चियान विक्रमबद्दलचं ‘ते’ वक्तव्य अनुराग कश्यपला पडलं महागात; नेटकरी म्हणाले “प्रसिद्धीसाठी हपापलेला…”

शाहरुख खानच्या ‘पठाण’चं उदाहरण देत ते पुढे म्हणाले, “शाहरुख खानने रिमेक केला नाही, पठाण हा एक आरिजिनल चित्रपट होता. चित्रपटात एखादी गोष्ट तुम्हाला खटकू शकते, पण चित्रपट वेगळा असेल, कथानक वेगळं असेल तर लोक त्याला नक्कीच पसंती देतात. ‘पठाण’मध्ये हे सगळंच छान जुळून आलं होतं.” इतकंच नव्हे तर अजय देवगणच्या ‘दृश्यम २’चा दाखल देत तरण यांनी तो चित्रपट आजवरचा एक उत्तम रिमेक असं वक्तव्य केलं आहे.

Story img Loader