सध्या बॉलिवूडच्या मोठमोठ्या स्टार्सचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणकून आपटत आहेत तर स्टार्स नसलेले ‘द केरला स्टोरी’सारखे चित्रपट बॉक्स ऑफिसवर १५० कोटींचा गल्ला जमवत आहेत. शाहरुख खानचा ‘पठाण’सोडला तर यावर्षीदेखील इतर कोणत्याही बॉलिवूड चित्रपटाला इतकं घवघवीत यश मिळालेलं नाही. या एकंदर परिस्थितीविषयीच चित्रपट समीक्षक आणि सिनेतज्ञ तरण आदर्श यांनी भाष्य केलं आहे.

‘बॉलिवूड हंगामा’शी संवाद साधताना तरण आदर्श यांनी चित्रपट व्यवसायाच्या सद्यस्थितीवर भाष्य केलं आहे. इतकंच नव्हे तर चित्रपट वितरकांना फायदा होईल असे चित्रपट निघाले पाहिजेत असं तरण आदर्श यांचं निरीक्षण आहे. ही गोष्ट स्पष्ट करताना त्यांनी ‘पठाण’चं उदाहरण देत यावर वक्तव्य केलं.

salman khan going to perform in dubai
बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याच्या धमक्यांदरम्यान सलमान खान परदेशात करणार शो; चाहते म्हणाले, “भाईजान वाघासारखा…”
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Salman Khan Was Initially Considered for Ghajini
सलमान खान करणार होता ‘गजनी’त मुख्य भूमिका, पण ‘या’ कारणाने आमिरची लागली वर्णी, खलनायकाने केला मोठा खुलासा
Shraddha Kapoor
Video: श्रद्धा कपूरच्या साधेपणाने जिंकले मन; अभिनेत्रीच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, म्हणाले, “तिच्या संस्कारातून…”
The Forgotten Hero from Kapoor family Trilok Kapoor
कपूर कुटुंबातील पहिला पण विस्मृतीत गेलेला स्टार, दिले होते अनेक हिट सिनेमे
Salman Khan Old Viral Video
Salman Khan Old Video : “काळवीटची शिकार मी केलीच नाही”, लॉरेन्स बिश्नोईच्या नावे धमकीनंतर सलमान खानचा जुना VIDEO पुन्हा चर्चेत!
babita fogat claims aamir khan dangal movie two thousand crore collection
“दंगलने २ हजार कोटी कमावले अन् आम्हाला फक्त…”, बबिता फोगटचा मोठा खुलासा, म्हणाली, “माझ्या वडिलांनी…”
Aadinath Kothare
आदिनाथ कोठारे हनुमंत केंद्रेंपर्यंत कसा पोहोचला? म्हणाला, “मग मी नांदेडच्या…”

आणखी वाचा : ‘Tiger 3’च्या सेटवर सलमान खानला दुखापत; भाईजानने ट्वीट करत लिहिलं, “टायगर…”

मुलाखतीमध्ये तरण आदर्श म्हणाले, “चित्रपट वितरक यांचा फायदा होणं हे सध्या चित्रपट व्यवसायासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण कोविडनंतर त्यांना जबरदस्त फटका बसला आहे. सध्या चित्रपटसृष्टी आयसीयु (ICU)मध्ये आहे. पठाणला जबरदस्त यश मिळालं, पण त्या एकाच चित्रपटावर अवलंबून राहू शकत नाही. जर बॉक्स ऑफिसवर लोकांची गर्दी हवी असेल तर असे आणखी ‘पठाण’ प्रदर्शित होणं चित्रपटसृष्टीसाठी अत्यावश्यक आहे.”

याबरोबरच सध्या प्रादेशिक कथांवर भर द्यायला पाहिजे असंही तरण आदर्श यांनी स्पष्ट केलं. याबरोबरच सध्या चित्रपटसृष्टी ही अत्यंत नाजूक परिस्थितीमध्ये आहे आणि चित्रपट निर्मात्यांनी रिमेकच्या कुबड्या सोडून काहीतरी नवीन प्रेक्षकांना द्यायला पाहिजे असंही निरीक्षण तरण आदर्श यांनी या मुलाखतीमध्ये मांडलं.