शाहरुख खानचा ‘डंकी’ व प्रभासचा ‘सालार’ हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी येणार असल्याची चर्चा गेले काही दिवस सुरू होती. अद्याप ‘सालार’च्या निर्मात्यांनी या गोष्टीची पुष्टी केलेली नाही. पण मीडिया रीपोर्ट आणि काही ट्रेड एक्स्पर्टच्या म्हणण्यानुसार ‘सालार’च्या निर्मात्यांनी २२ डिसेंबर २०२३ ही तारीख निश्चित केल्याचं समोर येत आहे. याचदिवशी शाहरुख खान व राजकुमार हिरानी यांचा ‘डंकी’ येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता असं सांगितलं जातंय की ‘सालार’चे निर्माते होम्बाले फिल्म्स यांनी हा निर्णय जाणून बुजून घेतला आहे. ट्रेड एक्स्पर्ट मनोबाला विजयबालन यांनी सांगितले की, सालारच्या निर्मात्यांची ही मास्टर स्ट्रॅटेजी आहे. ते सहसा त्याच्या चित्रपटांसाठी सर्व चांगल्या तारखा ब्लॉक करतो.

आणखी वाचा : ‘फीमेल ओपनहायमर’ म्हणत ट्रोल करणाऱ्यांना एमी जॅक्सनने दिलं चोख उत्तर; म्हणाली, “एखादी स्त्री…”

आपल्या ट्वीटमध्ये ते पुढे लिहितात, “१४ एप्रिल २०२२ ही तारीख प्रभासच्या ‘सालार’साठी नक्की करण्यात आली होती, नंतर ती तारीख पुढे ढकलून त्याऐवजी त्यांनी ‘केजीएफ २’ प्रदर्शित केला जो विजयच्या ‘बीस्ट’बरोबर प्रदर्शित झाला. आतादेखील २२ डिसेंबर ही तारीख त्यांनी ‘युवा’ या चित्रपटासाठी राखीव ठेवली होती पण आता त्याजागी ते ‘सालार’ प्रदर्शित करणार आहेत.”

‘केजीएफ चॅप्टर २’समोर थलपती विजयचा ‘बीस्ट’ बॉक्स ऑफिसवर टिकू शकला नाही. आता ‘डंकी’समोर ‘सालार’ प्रदर्शित झाला तर नक्कीच शाहरुखच्या चित्रपटाच्या कमाईवर त्याचा परिणाम होऊ शकतो असं बऱ्याच ट्रेड एक्स्पर्टचं म्हणणं आहे. अद्याप याबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी ‘सालार’च्या निर्मात्यांची स्ट्रॅटजी पाहता हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होऊ शकतात ही शक्यता नाकारता येत नाही.