बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा अलीकडे एका कारणामुळे चर्चेत आहेत. दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ट्रॅफिक जॅममुळे शूटिंगला पोहचण्यासाठी उशीर होत असल्यामुळे दोघांनी बाइकवरून शूटिंग सेट गाठला होता. दोघांचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र, कार सोडून बाइकवर जाणं अनुष्काला चांगलंच महागात पडलं आहे. बाइकवर बसताना अनुष्काने हेल्मेट न घातल्यामुळे वाहतूक विभागाने तिला दंड ठोठावला आहे. एवढंच नाही तर अमिताभ बच्चन यांनीही हेल्मेट न घातल्यामुळे त्यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- ‘डॉन ३’मधून शाहरुख खानने घेतला काढता पाय; नवा अभिनेता साकारणार फरहान अख्तरच्या चित्रपटात भूमिका

खरं तर अनुष्का शर्मा आणि अमिताभ बच्चन यांना शूटिंग सेटवर वेळेवर पोहोचायचं होतं. पण त्यांची गाडी मुंबईच्या ट्रॅफिक जॅममध्ये अडकली. अखेर अमिताभ बच्चन एका अनोळखी व्यक्तीच्या मदतीने शूटिंग सेटवर पोहोचले होते. त्या व्यक्तीचे त्यांनी आभारही मानले. गाडीवर जातानाचा अमिताभ बच्चन यांचा फोटोही व्हायरल झाला होता. काही चाहत्यांनी अमिताभ बच्चन यांच्या या कृतीचं कौतुक केलं आहे तर काहींनी त्यांना हेल्मेट न घातल्याने ट्रोल केलं आहे.

अमिताभ यांच्यासारखं अनुष्का शर्मादेखील वेळेत सेटवर पोहोचण्यासाठी कार मध्यभागी सोडून तिच्या अंगरक्षकासह बाइकवरून प्रवास करताना दिसून आली होती. पण ट्विटर युजर्सना दोन्ही कलाकारांची ही कृती आवडली नाही. दोघांनीही बाइकवर हेल्मेट न घातल्यामुळे नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं आहे. काहींनी तर याबाबत थेट वाहतूक पोलिसांकडे तक्रार केली आहे. वाहतूक पोलिसांनीही या प्रकरणाची दखल घेत ही बाब वाहतूक शाखेला सांगितली. यानंतर ‘टाइम्स नाऊ’च्या वृत्तानुसार, अनुष्का शर्माचा अंगरक्षक सोनू शेखलाही या कृत्यासाठी दंड ठोठावण्यात आला आहे.

हेही वाचा- कान्सच्या रेड कार्पेटवर नवरीसारखी सजली ‘सारा’, नेटकरी कौतुक करीत म्हणाले, “भारतीय पोशाखापेक्षा…”

वृत्तानुसार, मुंबई पोलिसांनी अनुष्का शर्माचा अंगरक्षक सोनू शेख याच्याविरुद्ध कलम १२९/१९४, कलम ५/१८० आणि कलम ३(१)१८ अंतर्गत चालान जारी केले आहे. यासोबतच १०,५०० रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. यासोबतच मुंबई पोलिसांनीही हा दंड वसूल केल्याची खात्री केली आहे. अनुष्का शर्माप्रमाणेच अमिताभ बच्चन आणि त्यांना मदत करणाऱ्या राइडरलाही दंड ठोठावला जाण्याची शक्यता आहे.