एकेकाळी बॉलिवूडमध्ये सुपरहिट चित्रपट देऊन इंडस्ट्री सोडणारी अभिनेत्री सोनम मागच्या काही काळापासून चर्चेत आहे. ती सोनम राय आणि सोनम खान म्हणूनही ओळखली जाते. तिने अवघ्या १९व्या वर्षी बॉलिवूड सोडलं होतं. पण तेवढ्या तरुण वयात अभिनय सोडण्यापूर्वी तिने जवळपास ३० चित्रपटांमध्ये काम केलं होतं. अलीकडेच तिने इंडस्ट्रीत पुनरागमन करण्याची इच्छाही व्यक्त केली होती.

अलीकडेच सोनमने तिच्या सोशल मीडियावर अकाउंटवर प्राईमचा थ्रोबॅक फोटो शेअर केला. सोनमने या फोटोला कॅप्शन दिलं, “वय फक्त १९… एक अभिनेत्री म्हणून निवृत्ती घेतली, तेव्हाचा फोटो… नंतर एकसंथ आयुष्य सुरू झाले.” दरम्यान, तिच्या चाहत्यांनी या फोटोवर कमेंटस् केल्या आहेत. “तुम्ही खूप सुंदर दिसता, तुम्ही अजूनही पुनरागमन करू शकता”, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.

सोनमने १९९१ मध्ये ‘गुप्त’ चित्रपटाचे निर्माते राजीव राय यांच्याशी लग्न केलं आणि या जोडप्याला लवकरच गौरव नावाचा मुलगा झाला. लग्नानंतर सोनमने बॉलिवूड सोडलं. तिने ‘त्रिदेव’, ‘मिट्टी और सोना’, ‘आखरी गुलाम’, ‘लष्कर’, ‘अजूबा’ आणि ‘विश्वात्मा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या होत्या. अलीकडेच सोनमने इंडस्ट्रीत परत यायची इच्छाही व्यक्त केली होती.

Story img Loader