रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ चित्रपटात दमदार अभिनयासाठी प्रेक्षकांकडून कौतुक मिळवणारी तृप्ती डिमरी हिने आता मुंबईत घर घेतलं आहे. ‘ॲनिमल’ मध्ये एक छोटीशी भूमिका करून नॅशनल क्रश ठरलेली तृप्ती आता मुंबईतील वांद्रे भागात एका सुंदर घराची मालकीण झाली आहे. अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी राहत असलेल्या वांद्रेमध्ये आता तृप्तीने घर घेतलं आहे, तिच्या घराची किंमत व इतर तपशील समोर आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘इंडेक्सटॅप.कॉम’ या वेबसाइटवर तृप्ती डिमरीच्या नवीन घराच्या नोंदणीसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. मालमत्तेच्या नोंदणीच्या कागदपत्रांनुसार तृप्तीने स्वतःसाठी तब्बल १४ कोटी रुपयांचे घर विकत घेतले आहे. नवीन घर घेतल्यावर तृप्ती बॉलीवूडमधील काही दिग्गज बॉलीवूड सेलिब्रिटींच्या शेजारी राहणार आहे.

छाया कदम लग्न न करण्याच्या निर्णयाबद्दल म्हणाल्या, “मला वाटतं काही वर्षांपूर्वी…”

तृप्तीचा आलिशान बंगला कार्टर रोडजवळ आहे. या भागातच शाहरुख खान, सलमान खान, रेखा यांसारखे बॉलीवूड स्टार राहतात. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट देखील याच परिसरात राहतात. तृप्तीचे नवीन घर दोन मजली आहे. तिच्या घराचे एकूण क्षेत्रफळ २२२६ चौरस फूट आहे. या घरासाठी तृप्तीने ७० लाख रुपये मुद्रांक शुल्क आणि ३० हजार रुपये नोंदणी शुल्क भरले आहे, असा दावा अहवालात करण्यात आला आहे. तृप्तीच्या नवीन घराच्या या व्यवहाराची नोंदणी ३ जून रोजी झाली होती.

मुंबई सोडून कुटुंबासह विदेशात स्थायिक झालीये मराठमोळी अभिनेत्री; कारण सांगत म्हणाली, “मला कामाच्या ऑफर…”

तृप्ती ही मूळची उत्तराखंड येथील गढवालची आहे. तिने २०१७ मध्ये श्रीदेवी यांच्या ‘मॉम’ व सनी देओलचा ‘पोस्टर बॉईज’ यांसारख्या चित्रपटांतून अभिनयात पदार्पण केलं. पण साजिद अलीच्या ‘लैला मजनू’ मुळे तिला लोकप्रियता मिळाली. त्यानंतर २०२० मध्ये आलेला ‘बुलबुल’ हा तिचा चित्रपट हिट ठरला होता. मग ती अन्विता दत्तच्या ‘कला’ सिनेमात मुख्य भूमिकेत झळकली होती, या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

शाहरुख खान मध्यरात्री कर्मचाऱ्याच्या झोपडपट्टीतील घरी जायचा, प्रसिद्ध कॉमेडियनचा दावा; म्हणाला, “मी तिथे भाड्याने…”

रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ चित्रपटात तृप्तीने झोया ही भूमिका साकारली होती. या चित्रपटाने तिला रातोरात स्टार केलं आणि ती नॅशनल क्रश बनली. तिच्या सोशल मीडिया फॉलोअर्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. यानंतर तिला अनेक मोठे चित्रपट मिळाले आहेत. ती लवकरच ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’मध्ये राजकुमार रावबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. तसेच ती आता कार्तिक आर्यन आणि विद्या बालनबरोबर ‘भूल भुलैया ३’ चे शूटिंग करत आहे. याशिवाय तिच्याकडे करण जोहरचा विकी कौशल आणि एमी विर्कबरोबरचा ‘बॅड न्यूज’ आणि सिद्धांत चतुर्वेदीसोबत ‘धडक २’ हे सिनेमे आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tripti dimri bought 14 crore house in bandra mumbai shares neighborhood with bollywood superstars hrc