तृप्ती डिमरी तिच्या ‘भूल भुलैया ३’ मधील सहकलाकार कार्तिक आर्यनबरोबर ‘आशिकी ३’ मध्ये पुन्हा झळकणार होती. गेल्या वर्षी याची घोषणा करण्यात आली होती, आणि मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांनी मुहूर्त शॉटही दिला होता. मात्र, आज (८ जानेवारी २०२४) तृप्ती या चित्रपटाचा भाग नसेल अशा चर्चा आहेत.
मंगळवारी, ‘मिड-डे’ने अहवाल दिला की तृप्ती आता ‘आशिकी ३’ मध्ये काम करणार नाही. तृप्ती या रोमँटिक चित्रपटासाठी खूप उत्सुक होती, पण आता हे घडणार नाही. ‘आशिकी ३’च्या टायटल संबंधित काही वाद चालू आहे. त्यामुळे हा सिनेमा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे,” असे एका सूत्राने सांगितले. अहवालानुसार, शूटिंगला उशीर झाल्यामुळे तृप्तीने चित्रपट स्वतःहून सोडला.
हेही वाचा…Video: श्रीदेवींचे पती बोनी कपूर यांचा लेकींबरोबरचा मजेशीर अंदाज पाहिलात का? व्हिडीओ होतोय व्हायरल
‘आशिकी ३’च्या निर्मात्यांनी तृप्तीला चित्रपटातून हटवले
Hindusthan Times ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या बातमीनुसार ‘आशिकी ३’च्या निर्मात्यांनी तृप्तीला चित्रपटातून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनुसार निर्मात्यांना या चित्रपटासाठी नायिकेमध्ये निरागसता दिसणे आवश्यक आहे असे वाटत आहे. पण तृप्ती डिमरीच्या अलीकडच्या चित्रपटांमुळे तिची प्रतिमा बदलली आहे, यामुळे ती भूमिकेसाठी योग्य वाटत नाही.
‘अॅनिमल’नंतर तृप्तीच्या प्रतिमेवर परिणाम
तृप्तीच्या प्रतिमेत ‘अॅनिमल’नंतर बदल झाल्यामुळे निर्मात्यांना ती या भूमिकेसाठी योग्य वाटत नाही, असेही सूत्राने सांगितले. आशिकी हा एक प्रेमकथानक असलेला चित्रपट आहे. निर्मात्यांना तृप्ती ही त्या पात्रासाठी योग्य वाटत नाही असे सूत्राने सांगितले. शिवाय, तिच्या अलीकडच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर फारसा चांगला परफॉर्मन्स दिला नाही.