‘अ‍ॅनिमल’ चित्रपट १ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. पण या चित्रपटाच्या कमाईपेक्षा आणि इतर कलाकारांपेक्षा सर्वाधिक चर्चा कुणाची होत असेल तर ती आहे तृप्ती डिमरी. तिने या चित्रपटात झोया रियाझ ही भूमिका साकारली आहे. या चित्रपटानंतर तिच्या सोशल मीडिया फॉलोअर्सच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. तसेच लोकप्रियतेच्या बाबतीत तिने अनेक आघाडीच्या कलाकारांना मागे टाकलं आहे.

IMDb चाहत्यांच्या आवडीनुसार नियमितपणे सर्वात लोकप्रिय अभिनेते आणि प्रसिद्ध सेलिब्रिटींची यादी प्रसिद्ध करते. एका ठराविक कालावधीत इंटरनेटवर कोणते सेलिब्रिटी सर्वात जास्त चर्चेत होते, यावरून ही यादी ठरते. या आठवड्यातील यादी पाहता पहिल्या क्रमांकावर तृप्ती डिमरी आहे. तिने आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत फक्त पाच चित्रपट केले आहेत आणि सध्या लोकप्रियतेच्या बाबतीत तिने अनेक मोठ्या स्टार्सला मागे टाकलं आहे.

Shah Rukh Khan Rejected Karan Arjun
‘या’ कारणामुळे शाहरुख खानने ‘करण अर्जुन’ करायला दिला होता नकार, आमिर खानची लागली होती वर्णी, पण…
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
raveena tandon 8 movies hit in a year
‘या’ अभिनेत्रीने एकेकाळी सेटवर साफ केला कचरा, पहिलाच सिनेमा झाला फ्लॉप; नंतर एकाच वर्षात दिले आठ सुपरहिट सिनेमे
Kal ho naa ho
“तिथे उपस्थित असलेल्या…”, ‘त्या’ सिनेमातील शाहरुख खानच्या मृत्यूच्या सीनबद्दल अभिनेत्रीचा मोठा खुलासा
Maharashtrachi Hasyajatra Fame Actress
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला ओळखलंत का?
hrithik roshan share karan arjun movie memory
शाहरुख-सलमानची प्रमुख भूमिका, कौटुंबिक ड्रामा अन्…; ३० वर्षांनी पुन्हा प्रदर्शित होणार ‘हा’ चित्रपट, हृतिक रोशनशी आहे खास कनेक्शन
madhuri dixit tezaab is highest grossing film of 1988
आधीचे १० सिनेमे झाले फ्लॉप, ‘या’ एका चित्रपटामुळे माधुरी दीक्षित रातोरात झाली सुपरस्टार! शाहरुखशी आहे खास कनेक्शन
Shah Rukh Khan
“शूटिंगच्या पहिल्या दिवशी तो माझ्याकडे आला अन् म्हणाला….”, बॉलीवूड अभिनेत्रीने शाहरुख खानबद्दल केलं वक्तव्य चर्चेत

‘अ‍ॅनिमल’ चित्रपटासाठी तृप्ती डिमरीने घेतलं फक्त ‘इतकं’ मानधन

मंगळवारी (१२ डिसेंबर रोजी) IMDb ने या आठवड्यात भारतातील सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटींची यादी शेअर केली. ‘अॅनिमल’मध्ये झळकलेली तृप्ती डिमरी या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. ‘अॅनिमल’पूर्वी केवळ चार चित्रपटांमध्ये काम केलेल्या या अभिनेत्रीने गेल्या आठवड्यात पहिल्या क्रमांकावर असलेल्या शाहरुख खानची जागा घेतली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ‘अॅनिमल’ चित्रपटातील मुख्य अभिनेता रणबीर कपूर, दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांची नावं या यादीत तृप्ती डिमरीच्या नावाच्या खाली आहेत. केवळ २० मिनिटांच्या कॅमिओसाठी चित्रपटात दिसलेल्या तृप्तीने चित्रपटाची मुख्य अभिनेत्री रश्मिका मंदानालाही मागे टाकलं आहे.

माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने यांचं मराठी ऐकलंत का? म्हणाले, “माझं मराठी…”

‘अॅनिमल’ चित्रपटातील कलाकार आणि शाहरुख खानव्यतिरिक्त तृप्तीने या यादीत अनेकांना मागे टाकलं आहे. इतर नावांमध्ये दीपिका पदुकोण, विकी कौशल, प्रभास, सुहाना खान आणि खुशी कपूर, दिग्दर्शक झोया अख्तर आणि राजकुमार हिरानी, केजीएफ स्टार यश आणि तापसी पन्नू यांचा समावेश आहे. या महिन्यातील सर्वात मोठे रिलीज झालेले किंवा होणारे चित्रपट ‘अ‍ॅनिमल’ व्यतिरिक्त ‘द आर्चीज’, ‘सॅम बहादूर’, ‘डंकी’ आणि ‘सालार’ आहेत.