रणबीर कपूरच्या बहुचर्चित ‘अॅनिमल’ या चित्रपटात छोटी पण महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या तृप्ती डिमरीची सगळीकडे चर्चा आहे. या चित्रपटात तिने साकारलेल्या झोयाच्या भूमिकेसाठी तिचं खूप कौतुक होत आहे. आता तृप्तीने रणबीरबरोबरचे तिचे इंटिमेट सीन पाहून पालकांची प्रतिक्रिया काय होती, याबाबत खुलासा केला आहे. तसेच हा सीन शूट करताना सेटवर मोजकेच लोक होते, असंही तिने सांगितलं.
‘बॉलीवूड हंगामा’शी बोलताना तृप्ती म्हणाली, “हा सीन पाहून माझे आई-वडील थोडे अचंबित झाले होते. ते म्हणाले, ‘आम्ही चित्रपटांमध्ये असं कधीही पाहिलं नाही आणि तू ते केलंय.’ त्यांना मी केलेला तो सीन स्वीकारायला वेळ लागला. पण ते माझ्याशी खूप छान वागत होते. ‘तू असे सीन करायला नको होते, पण केलाय तर ठीक आहे. पालक म्हणून आम्हाला या सीनचा फरक नक्कीच पडेल’ असं ते म्हणाले. मी त्यांना म्हणाले की मी काही चुकीचे करत नाही. हे माझे काम आहे आणि जोपर्यंत मी कंफर्टेबल आणि सुरक्षित आहे तोपर्यंत मला असे सीन करण्यात कोणतीही अडचण वाटत नाही. मी एक अभिनेत्री आहे आणि मी साकारत असलेल्या व्यक्तिरेखेशी मी १०० टक्के प्रामाणिक असले पाहिजे, त्यामुळे मी तेच केले.”
यापूर्वी ‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत तृप्तीने हे इंटिमेट सीन कसे शूट केले, याबद्दल सांगितलं होतं. सेटवर फक्त चार-पाच जण होते आणि तिथे इतर कोणालाही यायची परवानगी नव्हती. “दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर, मी आणि रणबीर सेटवर होतो. दर पाच मिनिटांनी ते मला विचारत होते, ‘तू ठीक आहेस ना? तुला काही हवं आहे का?’ सीन शूट करताना माझी खूप काळजी घेतली गेली, त्यामुळे मला अस्वस्थ वाटलं नाही,” असं तृप्ती म्हणाली होती.
दरम्यान, १ डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी करत आहे. नऊ दिवसात चित्रपटाने ३९८.५ कोटी रुपयांचा व्यवसाय देशभरात केला आहे. आज रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.