‘अ‍ॅनिमल’ चित्रपट १ डिसेंबरला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, अनिल कपूर यांच्या अभिनयाची चर्चा होत आहेच, पण झोयाची भूमिका साकारणाऱ्या तृप्ती डिमरीने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या चित्रपटात काम करण्याचा तिचा अनुभव तृप्तीने सांगितला आहे. यावेळी रश्मिकाने सेटवर तिला कशी वागणूक दिली, याबाबतही तिने खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तृप्ती म्हणाली, “ती सेटवरची सर्वात गोड, गोड व्यक्ती आहे. तिने माझे स्वागत केले. सहसा, जेव्हा चित्रपटात दोन अभिनेत्री असतात, तेव्हा नेहमीच ती (निगेटीव्ह) एनर्जी असते… पण इथे असं काहीही नव्हतं, ती खूप हुशार आहे. ती माझ्याकडे आली आणि तिने मला मिठी मारली आणि तिने मला त्यांच्याबरोबर बसायला सांगितलं. तिला हे दिसत होते की मी थोडी ऑकवर्ड होते. पण तिने माझं खूप चांगलं स्वागत केलं. हा एखाद्याकडे असावा असा सर्वात चांगला गुण आहे, असं मला वाटतं.”

‘अ‍ॅनिमल’ चित्रपटामुळे ‘नॅशनल क्रश’ बनलेल्या तृप्ती डिमरीचं शिक्षण किती? जाणून घ्या तिची शैक्षणिक पार्श्वभूमी

पूजा तलवारला दिलेल्या मुलाखतीत तृप्तीने रश्मिकाबरोबरचा अनुभव सांगितल्यानंतर रणबीर कपूरबरोबर काम करण्याचा तिचा अनुभव सांगितला. यावेळी तिने रणबीरचा एक गुण सांगितला. रणबीर खूप उत्सुक व्यक्ती आहे. तो ज्याच्यासोबत काम करतो, त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला त्याला आवडतं, असं तृप्ती म्हणाली.

“सेटवर फक्त ५ जण, सगळे मॉनिटर्स बंद अन्…”, ‘अ‍ॅनिमल’मधील इंटिमेट सीनबद्दल तृप्ती डिमरीचं भाष्य; म्हणाली, “रणबीरने…”

‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाची सध्या बॉक्स ऑफिसवर क्रेझ पाहायला मिळत आहे. हा चित्रपट जबदस्त कामगिरी करत आहे. एका आठवड्यात या चित्रपटाने देशभरात ३०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. हा चित्रपट वडील व मुलाच्या काहिशा विचित्र नात्यावर भाष्य करणारा आहे. चित्रपटात तृप्ती डिमरीने झोया ही भूमिका साकारली असून तिचे व रणबीरचे काही इंटिमेट सीनही चित्रपटात आहेत.