रणबीर कपूरचा बहुचर्चित ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. चित्रपटाला अवघ्या पाच दिवसांत ४०० कोटींचा गल्ला जमावण्यात यश मिळालं आहे. ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाचं कथानक, त्यामधील हिंसा व बोल्ड सीन्समुळे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगावर अनेकांनी टीका केली. तर, याउलट काही जणांकडून रणबीर, बॉबी देओल, मराठी अभिनेते उपेंद्र लिमये, रश्मिका यांचं कौतुक करण्यात येत आहे. या मुख्य कलाकारांशिवाय ‘अ‍ॅनिमल’मुळे आणखी एक अभिनेत्री प्रसिद्धीझोतात येऊन रातोरात नॅशनल क्रश झाली ती म्हणजे तृप्ती डिमरी. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर तृप्तीच्या लोकप्रियतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याशिवाय इंटरनेटवर तिच्या आणि रणबीरच्या इंटिमेट सीन्सची जोरदार चर्चा सुरू आहे. या सगळ्यावर अभिनेत्रीने नुकत्याच इंडिया टूडेच्या मुलाखतीत भाष्य केलं.

तृप्ती डिमरीने ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटात झोया हे पात्र साकारलं आहे. तिच्या अभिनयाचं चित्रपट समीक्षकांकडून भरभरून कौतुक करण्यात येत आहे. यापूर्वी तिने ‘बुलबूल’, ‘काला’ अशा रहस्यमय चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती. परंतु, ‘अ‍ॅनिमल’मुळे तिला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट आणि यामधील इंटिमेट सीन याविषयी सांगताना तृप्ती म्हणाली, “संदीप सरांनी चित्रपट साइन करायच्या आधी त्या इंटिमेट सीनबद्दल आणि चित्रपटाच्या स्क्रिप्टबद्दल मला संपूर्ण माहिती दिली होती. तो सीन कशाप्रकारे शूट केला जाईल हे सुद्धा सांगितलं होतं. तसेच अंतिम निर्णय तुझा असेल…तुला या सीनबद्दल काहीच अडचण नसेल आणि शूट करणं सोयीचं असेल, तरच आपण पुढचा विचार करू असं त्याने कळवलं होतं.”

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर
Lakaht Ek Aamcha Dada
Video : “गावासमोर धिंड काढली नाही, तर…”, तुळजाचे डॅडींना चॅलेंज; नेटकरी सल्ला देत म्हणाले, “काहीही करून तुमचं नातं…”
‘या’ अभिनेत्याची एक चूक मनोज बाजपेयी यांच्या जीवावर बेतली असती; स्वतः खुलासा करत म्हणाले, “आमची जीप एका मोठ्या…”
Rahul Gandhi
Rahul Gandhi : भाजपा खासदाराचा राहुल गांधींवर धक्काबुक्की करुन पाडल्याचा आरोप, स्पष्टीकरण देत म्हणाले, “मला संसदेत…”
Delhi restaurant pays tribute to Atul Subhash
“तुला तिथे तरी शांती मिळेल…”, रेस्टॉरंटकडून अतुल सुभाष यांना वाहिली अनोखी आदरांजली

हेही वाचा : रितेश देशमुखने सासूबाईंच्या वाढदिवसानिमित्त शेअर केला खास फोटो! जिनिलीयाची आई कमेंट करत म्हणाली…

तृप्ती डिमरी पुढे म्हणाली, “चित्रपटातील त्या दोन पात्रांसाठी तो अतिशय महत्त्वाचा प्रसंग होता. त्यामुळे झोयाची भूमिका साकारताना मला काही अडचण, तर नाही ना? याची पूर्ण काळजी सेटवर घेण्यात आली. असे सीन्स शूट करताना आपण सेटवर पूर्णपणे प्रामाणिक राहणं आवश्यक असतं. आपल्याला काय सोयीचं आहे काय नाही…या गोष्टी सांगणं गरजेचं असतं. अर्थात आमच्या सेटवर सगळ्यांनीच मला खूप जास्त समजून घेतलं.”

“आम्ही सीन शूट करत असताना संदीप सरांनी वेळोवेळी मी व्यवस्थित आहे की नाही, मला काही अडचण नसावी या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली. याशिवाय रणबीर देखील दर ५ मिनिटांनी माझी चौकशी करत होता. मी अस्वस्थ होणार नाही याची काळजी त्याने घेतली. माझ्या सुदैवाने ‘बुलबूल’मधील बलात्कारचा सीन असो किंवा ‘अ‍ॅनिमल’ असो या दोन्ही चित्रपटांच्या सेटवर मला फार चांगली लोकं भेटली. या सीनदरम्यान सेटवर फक्त ५ जण उपस्थित होते. त्यापेक्षा जास्त जण उपस्थित नसतील याची वेळोवेळी सर्वांनी काळजी घेतली. त्यावेळी सेटवर फक्त दिग्दर्शक, डीओपी आणि कलाकारांशिवाय इतर कोणीही नव्हतं. सेटवर यायची कोणालाही परवानगी नव्हती, सगळे मॉनिटर्स बंद होते. याशिवाय शूट करताना तुला कधीही अस्वस्थ वाटलं, तर लगेच आम्हाला सांग आपण तुझ्या सोयीनुसार जाऊ असंही मला सांगितलं होतं. हे संवेदनशील सीन्स अशाप्रकारे शूट केले जातात याची कल्पना कोणालाही नसते” असं तृप्तीने सांगितलं.

हेही वाचा : रणबीरच्या ‘अ‍ॅनिमल’ची सहाव्या दिवशी रेकॉर्डतोड कमाई; शाहरुखच्या ‘पठाण’, ‘जवान’ चित्रपटांनाही टाकलं मागे

चित्रपटातील भूमिकेचं सर्वत्र कौतुक होतंय याबद्दल तृप्ती म्हणाली, “जेव्हा संदीप सरांशी मी याबद्दल चर्चा केली तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की, हे एक नकारात्मक पात्र आहे. पण, तुझी नकारात्मक बाजू पटकन लोकांना दिसणार नाही अशा पद्धतीने तुला ते साकारायचं आहे. तुझ्यातील निरागसता सर्वात आधी लोकांना दिसली पाहिजे. कोणतीही भूमिका करताना आपण १०० टक्के प्रयत्न करणं गरजेचं असतं. कारण, व्यक्तिरेखेला न्याय देणं खूप अवघड गोष्ट आहे. आज झोयाच्या भूमिकेचं होणारं कौतुक पाहून मी प्रचंड आनंदी आहे.”

Story img Loader