आपल्या दमदार अभिनयाबरोबरच सुमधुर आवाजासाठी ओळखला जाणारा आयुष्मान खुराना हा सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. आयुष्मानची एक व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आयुष्मान ‘दिल दिल पाकिस्तान’ हे गाणं गातान दिसत आहे. या व्हिडीओवरुन आयुष्मानला प्रचंड ट्रोल करण्यात आलं आहे. नुकताच आयुष्मान आयोध्येच्या राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला हजर होता अन् आता लगेचच हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने तो पुन्हा चर्चेत आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयुष्मानच्या या व्हिडीओवर त्याच्या चाहत्यांनी तसेच काही नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. लोकांनी त्याच्यावर चांगलीच आगपाखड केलेली दिसून येत आहे. एका सामाजिक कार्यकर्त्याने हा व्हिडीओ शेअर करत आयुष्मानवर आणि एकंदर बॉलिवूडवर टीका केली आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की हा व्हिडीओ फार जुना असून तो पुन्हा शेअर करण्यात आला आहे. २०१७ मध्ये आयोजित केलेल्या कॉन्सर्टमधील हा व्हिडीओ असल्याचं स्पष्ट झालं आहे.

आणखी वाचा : “मी बाहेर जाऊन उलटी…” शेखर कपूर यांनी सांगितली ‘बॅन्डिट क्वीन’च्या सामूहिक बलात्काराच्या सीनमागची आठवण

या कॉन्सर्टमध्ये आयुष्मानबरोबरच त्याचा भाऊ अपारशक्ति खुरानाही दिसत आहे. याबरोबरच पाकिस्तानी गायक अली जफरनेसुद्धा या कॉन्सर्टमध्ये आयुष्मानबरोबर परफॉर्म केलं होतं. दोन देशांमधील संबंध अधिक मैत्रीपूर्ण व्हावेत या उद्देशाने हा कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. याचदरम्यान खास पाकिस्तानी चाहत्यांसाठी अन् तिथल्या लोकांसाठी आयुष्मानने ‘दिल दिल पाकिस्तान’ हे गाणे अली जफरबरोबर गायले.

इतकंच नव्हे तर यानंतर आयुष्मानने त्याच कॉन्सर्टमध्ये ‘चक दे इंडिया’ हे गाणंदेखील म्हंटलं अन् अली जफरने त्याल उत्तम साथही दिली. परंतु ट्विटरवर फक्त त्याचे ‘दिल दिल पाकिस्तान’ हेच गाणे व्हायरल होत आहे. दुबईमध्ये आयोजित केलेल्या या कॉन्सर्टमध्ये आयुष्मानने श्रीलंका, भारत, बांग्लादेश, पाकिस्तान या देशांना मानवंदना देण्यासाठी गाणं म्हंटलं होतं. व्हायरल व्हिडीओमध्ये आयुष्मानने पाकिस्तानला भेट दिली असून तिथे त्याने हे गाणं म्हंटल्याची अफवाही समोर आली, परंतु ती बातमी खोटी असून हा व्हिडीओ दुबईच्या कॉन्सर्टमधीलच असल्याचं स्पष्ट झालं आहे. ‘न्यूज रूम पोस्ट’ने या व्हिडीओची शहानिशा करत याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Truth behind ayushmann khurrana singing dil dil pakistan viral video avn