बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर व अभिनेत्री श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत असलेला ‘तू झुठी मैं मक्कार’ हा चित्रपट ८ मार्चला प्रदर्शित झाला. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू होती. या चित्रपटातील गाण्यांनाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच स्क्रीन शेअर केलेल्या रणबीर व श्रद्धाची केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते.

रणबीर व श्रद्धाच्या ‘तू झूठी मैं मक्कार’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या दिवशी १५. ७३ कोटींचा गल्ला जमवला. होळी आणि धुळवडीच्या सुट्ट्यांमुळे या चित्रपटाला फायदा झाल्याचं दिसून आलं. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०.३४ कोटींची कमाई केली. पहिल्या दोनच दिवसांत रणबीर-श्रद्धाच्या चित्रपटाने २६.०७ कोटींची कमाई केली आहे. वीकेएण्डला हा आकडा आणखी कमाई करण्याची अपेक्षा वर्तविण्यात आली आहे.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
nitin Gadkari fraud loksatta,
नितीन गडकरी यांच्या नावाने १० सराफा व्यावसायिकांची फसवणूक; तोतया सुरक्षा अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा
Navri Mile Hitlarla
“तुला माझ्यासाठी…”, सुनांच्या हट्टासाठी एजेने दिली शिक्षा; लीलाचा आनंद मात्र गगनात मावेना, पाहा प्रोमो
shradhha kapoor shakti kapoor
शक्ती कपूर यांनी ‘ही’ सवय सोडण्यासाठी बिग बॉसमध्ये घेतला होता सहभाग; आठवण सांगत म्हणाले, “मी श्रद्धाला सिद्ध करून…”
chala hawa yeu dya reality show got less trp from last few years
‘चला हवा येऊ द्या’कडे प्रेक्षकांनी का पाठ फिरवली, TRP कमी का झाला? भाऊ कदम म्हणाले, “दुसऱ्या चॅनेलवरच्या कॉमेडी शोमध्ये…”
prashant bhushan on gst nirmala sitharaman
Nirmala Sitharaman: “निर्मला सीतारमण जीनियस आहेत, १ लाखाच्या कारवर…”, प्रशांत भूषण यांनी GST चं मांडलं गणित!

हेही वाचा>> नवाब मलिकांबाबत प्रश्न विचारताच क्रांती रेडकरचं दोन शब्दांत उत्तर, म्हणाली…

‘तू झूठी मैं मक्कार’ मध्ये रणबीर आणि श्रद्धासह डिंपल कपाडिया, बोनी कपूर आणि कॉमेडियन अनुभव सिंग बस्सी हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. अभिनेता म्हणून बोनी कपूर यांचा हा पहिलाच चित्रपट आहे.

हेही वाचा>> ५६ व्या वर्षी वडील झालेल्या सतीश कौशिक यांना वाटायची खंत, म्हणाले होते “मुलीमागे पळणं मला…”

रणबीर व श्रद्धाच्या या चित्रपटाने आयएमडीबी रेटिंगमध्ये शाहरुख खानच्या पठाणला टक्कर दिली आहे. ‘पठाण’ला आयएमडीबीवर १० पैकी ६.४ असं रेटिंग मिळालं आहे तर रणबीर श्रद्धाच्या ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटाला पहिल्याच दिवशी १० पैकी ६.७ असं रेटिंग मिळालं आहे. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही उत्तम कामगिरी करेल, अशी अपेक्षा आहे.

Story img Loader