बंगाली गायक अनुप घोषाल यांचे निधन झाले आहे. ते ७७ वर्षांचे होते, त्यांचे शुक्रवारी (१५ डिसेंबर रोजी) निधन झाले, अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे. अनुप १९८३ मध्ये आलेल्या ‘मासूम’ चित्रपटातील ‘तुझसे नाराज नहीं जिंदगी’ या गाण्यासाठी लोकप्रिय होते. त्यांनी सत्यजित रे यांनी संगीतबद्ध केलेली अनेक गाणी गायली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रकृती खालावल्यामुळे अनुप गेल्या अनेक दिवसांपासून दक्षिण कोलकाता येथील एका खासगी रुग्णालयात दाखल होते. शुक्रवारी दुपारी १.४० वाजता अनेक अवयव निकामी झाल्याने त्यांचे निधन झाले. अनुप यांच्या पश्चात दोन मुली आहेत. अनुप यांनी तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर उत्तरपारा मतदारसंघातून २०११ ची विधानसभा निवडणूक लढविली होती, या निवडणुकीत ते विजयी झाले.

“१० मिनिटांसाठी त्याचं ह्रदय बंद पडलं होतं”, श्रेयस तळपदेच्या प्रकृतीविषयी बॉबी देओलची माहिती

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. “बंगाली, हिंदी आणि इतर भाषांमध्ये गाणी गाणाऱ्या अनुप घोषाल यांच्या निधनाबद्दल मी दु:ख आणि शोक व्यक्त करते,” असं ममता बॅनर्जी शोकसंदेशात म्हणाल्या.

अनुप लोकप्रिय हिंदी गाण्यांमध्ये ‘मासूम’ चित्रपटातील ‘तुझसे नराज नहीं जिंदगी’, ‘हुस्न भी आप हैं, इश्क भी आप हैं’ आणि ‘शीशे का घर से तुम साथ हो जिंदगी भर लिए’ या लोकप्रिय गाण्यांचा समावेश आहे.