Tumbbad re-release box office collection: मराठमोळे दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांचा ‘तुंबाड’ चित्रपट दुसऱ्यांदा सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरला आहे. या चित्रपटाने आपल्या मूळ कलेक्शनच्या कमाईपेक्षा जास्त कलेक्शन केले आहे. ‘तुंबाड’ २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता, पण तेव्हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. तेव्हा चित्रपटाने जेवढी कमाई केली होती, त्याहून जास्त कमाई आता पुन्हा प्रदर्शित झाल्यावर सात दिवसांत केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुंबाडची एकूण कमाई किती?

‘तुंबाड’ हा चित्रपट १३ सप्टेंबर २०२४ रोजी पुन्हा प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटाने सहा दिवसांत १२.११ कोटी रुपयांची कमाई केली होती आणि सातव्या दिवशी चित्रपटाने १.३ कोटी रुपये कमावले. आता चित्रपटाची एकूण कमाई १३.४१ कोटी रुपये झाली आहे. ‘तुंबाड’ सहा वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला तेव्हा त्याची एकूण कमाई १२.५ कोटी रुपये होती. चित्रपटाने पुन्हा प्रदर्शित झाल्यावर मूळ बॉक्स ऑफिस कलेक्शनला मागे टाकले आहे.

वाईन पिण्यासाठी स्वीकारला ख्रिश्चन धर्म, बॉलीवूड अभिनेत्याच्या पत्नीचा मोठा खुलासा; म्हणाली, “मी खूप…”

इंडस्ट्रीतील तज्ज्ञांच्या मते, ‘तुंबाड’ री-रिलीजच्या माध्यमातून देशभरात २० कोटींहून जास्त कलेक्शन करेल. त्यामुळे या चित्रपटाचे एकूण कलेक्शन ३० कोटींच्या पुढे जाईल. आज राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त चित्रपटांच्या तिकिटांचे दर ९९ रुपये ठेवण्यात आले आहे. आज दुसऱ्या शुक्रवारी ‘तुंबाड’ला तिकिटांचे दर कमी असल्याचा फायदा होतो की नाही ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

“मंत्र्याची मुलगी मोलकरीण म्हणून आमच्या घरात…”, बॉलीवूड अभिनेत्याच्या पत्नीचा खुलासा; म्हणाली, “तिचे वडील…”

ओटीटीवर आहे ‘तुंबाड’

Tummbad on Prime Video: दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांचा ‘तुंबाड’ चित्रपट २०१५ सालीच तयार झाला होता, पण त्यातले स्पेशल इफेक्ट आणि इतर नवीन बदल करण्यासाठी त्यांना पुढची ३ वर्षं लागली होती. ‘तुंबाड’ हा प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

अमिताभ बच्चन-जया यांचे आंतरजातीय लग्न लावण्यास भटजीने दिलेला नकार; बिग बींचे सासरे म्हणाले होते, “लग्नाचे विधी…”

‘तुंबाड’ मराठीत का बनवला नव्हता?

२०१९ मध्ये ‘बीबीसी मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये राही अनिल बर्वे यांनी ‘तुंबाड’ मराठीत का बनवला नव्हता याचं उत्तर दिलं होतं. “मला संताप येतो या अशा प्रश्नांचा, असा प्रश्न विचारणाऱ्यांना मला सांगायचं आहे की त्यांनी तुंबाड पहा, किंवा माझी आधीची शॉर्टफिल्म मांजा पहा, मी अर्थात तुंबाड मराठीमध्ये करणं शक्यच नव्हतं. आत्ता कुठे मराठी चित्रपटसृष्टी श्वास घेऊ लागली आहे. अविनाश अरुण, नागराज मंजुळे, चैतन्य ताम्हाणे यासारखे दिग्दर्शक आत्ता पुढे येऊ लागलेत,” असं ते म्हणाले होते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tumbbad re release box office collection surpasses original run in week sohum shah rahi anil barve movie hrc