बॉलीवूड अभिनेता तुषार कपूर काही मोजक्या भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘गोलमाल’ या सिनेमातील त्याची ‘लकी’ची भूमिका विशेष गाजली. या सिनेमाच्या १ ते ४ या भागांमध्ये त्याने प्रेक्षकांना खळखळून हसवले. अलीकडेच तुषारने ‘दस जून की रात’ या वेब सीरिजद्वारे ओटीटी डेब्यू केला. मात्र, आता त्याच्या आयुष्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. त्याचं सार्वजनिक आणि खासगी फेसबुक अकाउंट हॅक झालं आहे. त्यामुळे तो फेसबुकवर काही काळापासून सक्रिय नव्हता, याची माहिती त्यानं चाहत्यांना दिली आहे.

तुषारने इन्स्टाग्रामवर दिलं महत्त्वाचं स्पष्टीकरण

इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करीत तुषार कपूरनं सांगितलं, “सर्वांना नमस्कार, मला तुमचं एका गोष्टीकडे लक्ष वेधायचं आहे. माझं सार्वजनिक आणि खासगी फेसबुक अकाउंट हॅक झालं आहे. त्यामुळेच मी सध्या या प्लॅटफॉर्मवर निष्क्रिय आहे. माझी टीम आणि मी मिळून हे अकाउंट पुनर्प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत आहोत. लवकरच ते पुन्हा सक्रिय होईल. तुमच्या सहकार्याबद्दल धन्यवाद.”

हेही वाचा…रणवीर सिंह ‘या’ भूमिकेसाठी माझ्यासमोर बसला होता तीन तास, शक्तिमान फेम अभिनेत्याच वक्तव्य; म्हणाला “त्याच्या चेहर्‍यावर…”

चित्रपटसृष्टीत काही लोकांनी मला नेहमीच खाली खेचलं : तुषार कपूर

तुषार कपूरनं अलीकडेच ‘दस जून की रात’ या वेब सीरिजमधून ओटीटी डेब्यू केला. या वेब सीरिजच्या प्रमोशनदरम्यान ‘इंडिया टुडे’शी बोलताना त्यानं करिअरबद्दलचं आपलं मत मांडलं. तुषार म्हणतो, “कधी कधी मला असं वाटतं की, चित्रपटसृष्टीत असा एक भाग आहे, जो मला कधीच स्वीकारू शकला नाही. हा समुदाय सतत तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतो, हे दु:खद असलं तरी सत्य आहे. पण, आता या सगळ्यातून मार्ग काढत मी पुढे सरकलो आहे.”

हेही वाचा…Video : शाहरुख खान आणि विकी कौशलचा ‘ऊ अंटावा’ गाण्यावर डान्स; समांथा रुथ प्रभू व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “मी स्वप्नातही…”

तुषारच्या आधी यूट्युबर रणवीर अलाहाबादियाचं अकाउंट हॅक झालं होतं

तुषार कपूरच्या आधी काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध यूट्युबर रणवीर अलाहाबादियाचं अकाउंट हॅक झालं होतं. सायबर क्रिमिनल्सनी त्याची दोन्ही यूट्यूब चॅनेल्स हॅक केली होती. तसेच, त्याच्या चॅनेलचं नाव बदलण्यात आलं होतं. सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांमुळे तुषार आणि रणवीरसारख्या कलाकारांना मोठा फटका बसला आहे.

Story img Loader