बॉलीवूडचे कलाकार हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे, कधी त्यांच्या चित्रपटांतील भूमिकेमुळे तर कधी त्याच्या वक्तव्यामुळे हे कलाकार चर्चांचा भाग बनतात. आता ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार ही बॉलीवूडमधील लाडकी जोडी चर्चेचा भाग बनली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ट्विंकल खन्नाने कॉलममध्ये एका सुट्टीचा तपशील देताना लिहिले आहे की, ती आणि अक्षय कुमार कॅम्पमध्ये परतत होते. त्यावेळी त्यांच्या गाईडने टिक-टिक या पक्ष्यांच्या प्रजातीविषयी सांगितले. या पक्षांची जोडपी एकमेकांप्रति समर्पित असतात. जर जोडीपैकी एक पक्षी आधी मेला तर तर त्याचा जोडीदार विषारी गवत खाऊन स्वत:ला मारुन घेतो.

काय म्हणाली होती ट्विंकल खन्ना?

गाईडने या पक्षांबद्दल ही माहिती दिल्यावर ट्विंकलने लगेच अक्षय कुमारला सांगितले, जर माझे तुझ्याआधी निधन झाले तर विषारी गवत खाणे तुझ्यासाठी चांगले आहे. जर तुझी दुसरी बायको माझ्या हँडबॅग्स घेवून फिरताना दिसली तर वचन देते की मी येईन आणि तुमच्या दोघांचा छळ करेन. हे ऐकताच अक्षय कुमारने ट्विंकल खन्नाची मस्करी करण्याची संधी सोडली नाही. तो म्हणला, हे सगळं ऐकण्यापेक्षा ते विषारी गवत लगेच खाऊन घेतो. म्हणजे असे सल्ले ऐकण्याची वेळ येणार नाही. असा मजेशीर किस्सा ट्विंकल खन्नाने आपल्या कॉलममध्ये लिहिला आहे.

हेही वाचा: Video: लीला संकटात असताना एजे मदतीला धावून येणार! विक्रांतचा खरा चेहरा.., ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित

अक्षय कुमार गेल्या काही दिवसांपासून त्याच्या एकापाठोपाठ फ्लॉफ होत असलेल्या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. मात्र अक्षय कुमारने आपण कायम प्रयत्न करत राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. नुकताच त्याचा ‘सरफिरा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. राधिका मदान या चित्रपटात त्याच्याबरोबर मुख्य भूमिकेत होती. ‘सरफिरा’ हा चित्रपटदेखील बॉक्स ऑफिसवर कमाल करु शकला नाही.

आता अक्षय कुमार एका कॉमेडी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. खेल खेल में या चित्रपटात अक्षय कुमार बरोबरच फरदीन खान, एमी विर्क, आदित्य सील, तापसी पन्नू, वाणी कपूर हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट फोनमध्ये असलेल्या गुपिताबद्दल असून कोणाचे कोणते गुपित बाहेर येणार, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर समजणार आहे. सध्या अक्षय कुमार आणि ‘खेल खेल में’ चित्रपटाची संपूर्ण टीम चित्रपटाचे प्रमोशन करण्यात व्यग्र असल्याचे पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Twinkle khanna advised akshay kumar if i die first better eat poisonous grass nsp