बॉलीवूड अभिनेत्री, लेखिका आणि इंटीरियर डिझायनर ट्विंकल खन्ना ही तिच्या वक्तव्यासाठी नेहमीच चर्चेत असते. नुकतेच तिने ब्रिटनमधील राजा चार्ल्स ३ च्या राज्याभिषेकादरम्यान खिल्ली उडवीत एक विनंती केली आहे. राजा चार्ल्स तिसरा यांच्या मुकुटात ‘कोहिनूर’ हिरा दिसत नसल्याने ट्विंकलने ब्रिटनला कोहिनूर हिरा भारताला परत करण्यास सांगितले आहे. याबरोबरच विजय मल्ल्या आणि ललित मोदी यांनादेखील भारताकडे सोपवण्याचे आवाहन अभिनेत्रीने ब्रिटिशांना केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अलीकडेच, ‘बकिंघम पॅलेस’ने घोषणा केली होती की राणी एलिझाबेथच्या मृत्यूनंतर, वादग्रस्त ‘कोहिनूर’ हिरा राजाच्या राज्याभिषेक सोहळ्यापासून दूर ठेवला जाईल. ‘कोहिनूर’ हिऱ्याचे वजन १०५ कॅरेट आहे. ‘कोहिनूर’चा अर्थ फारसीमध्ये ‘प्रकाशाचा पर्वत’ असा होतो. दक्षिण भारतातील कृष्णा नदीच्या काठी हा ८०० वर्षांपूर्वी सापडल्याचे म्हटले जाते. यानंतर, अनेक साम्राज्यांमधून फिरत १९ व्या शतकात तो ब्रिटनची राणी व्हिक्टोरियाच्या ताब्यात देण्यात आला. अशीही एक लोकप्रिय कथा आहे की ‘कोहिनूर’ हिरा शापित आहे आणि तो केवळ स्त्रियांसाठी, विशेषतः राण्यांसाठी सुरक्षित आहे.

आणखी वाचा : मर्डर मिस्ट्री, छोटा राजन अन् क्राइम रिपोर्टरच्या आयुष्यातील वादळ; हंसल मेहतांच्या ‘स्कूप’ वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित

आपल्या ट्वीटमध्ये ट्विंकल म्हणते, “पारंपरिक पद्धतीने राणीने तिच्या राज्याभिषेकाच्या वेळी हिऱ्यांनी जडवलेला मुकुट परिधान केला होता. पण या वेळी ‘बकिंघम पॅलेस’ने औपचारिक कारवाईत ‘कोहिनूर’चा वापर केला जाणार नाही, असे निवेदन जारी केले. याच कारणामुळे भारतीय पुन्हा एकदा ‘कोहिनूर’ परत करण्याची मागणी करीत आहेत. मी ब्रिटनकडे फक्त ‘कोहिनूर’च नाही तर आमची आणखी दोन अनमोल रत्ने, विजय मल्ल्या आणि ललित मोदी यांनादेखील भारताकडे सुपूर्द करावे ही विनंती करते.”

ट्विंकलने युनायटेड किंगडमचे पहिले भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याबद्दलही भाष्य केले आहे. ट्विंकलचे हे ट्वीट सध्या चांगलेच व्हायरल होत आहे. ‘कोहिनूर’ हिरा आता टॉवर ऑफ लंडनमध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात आला आहे. अलीकडेच भारत सरकारने ब्रिटिश सरकारला ‘कोहिनूर’ हिरा परत करण्याची वारंवार मागणी केली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Twinkle khanna ask uk to return kohinoor diamond vijay mallya and lalit modi avn