जवळपास सर्वच बॉलिवूड कलाकारांना कार्सची क्रेझ आहे. ते नेहमीच त्यांच्या आलिशान गाड्यांमधून फिरताना दिसतात. त्यांच्याकडे असलेल्या महागड्या गाड्या हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. पण कधी कधी ते आपल्या गाड्यांतून फिरण्याऐवजी सार्वजनिक वाहनांनी प्रवास करताना दिसतात. अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिने नुकताच रिक्षातून प्रवास करण्याचा आनंद उपभोगला.

अक्षय कुमारची बायको ट्विंकल ही नेहमीच तिच्या वागण्यामुळे सर्वांचं लक्ष तिच्याकडे वेधून घेत असते. आता नुकताच तिने तिच्या लेकीबरोबर रिक्षातून प्रवास केला. या वेळेचा तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

आणखी वाचा : Video: रितेश देशमुखच्या प्रश्नाचं करीना कपूरने दिलं मराठीत उत्तर, म्हणाली…; व्हिडीओ व्हायरल

या व्हायरल झालेल्या व्हिडीओ ट्विंकल खन्ना तिची लेक निताराबरोबर रिक्षातून प्रवास करताना दिसत आहे. यावेळी निताराच्या हातात त्यांनी केलेल्या खरेदीची पिशवी आहे. ट्विंकल रिक्षात बसून त्या रिक्षावाला “चलो भैय्या” असं म्हणत निघण्यास सांगते. यावेळी दोघी मायलेकी हसत-खेळत, गप्पा गोष्टी करत क्ष प्रवास करताना दिसल्या.

हेही वाचा : डिंपल कपाडिया यांनी अक्षय कुमारला घातली होती ट्विंकलबरोबर लिव्ह इनमध्ये राहण्याची अट, कारण…

ट्विंकलला रिक्षात बघून सर्वांनाच आश्चर्य वाटलं. असं कारण म्हणजे यापूर्वी कधीही कोणीही तिला सार्वजनिक वाहनातून प्रवास करताना पाहिलेलं नव्हतं. तिच्या या व्हिडीओवर तिथे चाहते कमेंट्स करत तिच्या या नम्रपणाचं कौतुक करत आहेत.

Story img Loader