बॉलीवूडची अभिनेत्री ट्विंकल खन्ना नेहमी चर्चेत असते. ट्विंकल आज बॉलीवूडपासून लांब असली तर सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. एवढंच नाही तर ट्विंकल तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळेही अनेकदा चर्चेत असते. नुकतंच एका मुलाखतीत ट्विंकल खन्नाने नोकरीबाबत मोठा खुलासा केला आहे. ट्विंकलच्या पहिल्या नोकरीवरून चांगलीच चर्चा रंगली आहे.
हेही वाचा- जबरदस्त ॲक्शन, सस्पेन्स अन् सनी लिओनीचा भन्नाट अंदाज; अनुराग कश्यपच्या ‘केनडी’चा टीझर प्रदर्शित
ट्विंकल म्हणाली, “मला आठवते की, माझे पहिले काम मासे आणि कोळंबी पोहोचवण्याचे होते. माझ्या आजीच्या बहिणीची माशांची कंपनी होती. या कंपनीचे नाव ‘मच्छीवाला’ होते. जेव्हा मी लोकांना माझ्या कामाबद्दल सांगायचे तेव्हा ते मला मच्छीवाली आहेस का? असं विचारायचे.”
ट्विंकल खन्नाने सांगितले की, नंतर तिने इंटीरियर डेकोरेटर म्हणूनही काम केले. तिला चार्टर्ड अकाउंटंट व्हायचे होते, म्हणून तिने एकाच वेळी सीए परीक्षेसाठी अर्ज केला होता. पण याच दरम्यान ट्विंकलकडे चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. मुलींसाठी पैसे कमवण्याची हीच योग्य वेळ आहे, असे आई डिंपल कपाडिया यांनी सांगितल्यानंतर ट्विंकलने अभिनयक्षेत्रात प्रवेश केला.
हेही वाचा- परिणीती आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्यासाठी प्रियांका चोप्रा भारतात येणार? चर्चांना उधाण
ट्विंकल खन्ना दिवंगत अभिनेते राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांची मुलगी आहे. ट्विंकलच्या फिल्मी करिअरबद्दल बोलायचे झाले तर ट्विंकल खन्नाने १९९५ मध्ये ‘बरसात’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर ती ‘जब प्यार किसी से होता है’, ‘मेला’, ‘जोरू का गुलाम’ आणि ‘बादशाह’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली. मात्र, बॉलीवूडमध्ये आपली चमक दाखवू न शकल्यामुळे ट्विंकलने २००१ मध्ये बॉलीवूडला रामराम ठोकला. यानंतर २०१५ साली तिने लेखनाच्या जगात प्रवेश केला. आत्तापर्यंत ट्विंकलने अनेक पुस्तके लिहिली आहेत.