बॉलीवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना आणि तिची आई डिम्पल कपाडिया नेहमी चर्चेत असतात. दोघीही गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीपासून लांब होत्या. पण ‘पठाण’, ‘तू झूठी मैं मक्कार’ आणि आता ‘सास बहू और फ्लेमिंगो’ चित्रपटातून डिम्पल कपाडियांनी बॉलीवूडमध्ये पुन्हा कमबॅक केलं आहे. मात्र, एकदा ट्विंकल खन्नाने आई डिम्पल कपाडियांना पैसै कमावण्यावरून खडे बोल सुनावले होते.
एका मुलाखतीत डिम्पल कपाडियांनी याबाबतचा खुलासा केला आहे. त्या म्हणाल्या, “माझ्या दोन्ही मुलींच्या पाठिंब्यामुळे मी पुन्हा चित्रपटांत कमबॅक करू शकले. जर माझ्या दोन्ही मुली नसत्या तर मी पुन्हा चित्रपटात येऊ शकले नसते. मी घरात आरामात बसले असते. पण माझ्या मुलींनी मला यापासून थांबवले.”
डिम्पल कपाडिया पुढे म्हणाल्या, ‘कदाचित मी खूप आधी काम सोडून घरी बसले असते. हे विचित्र आहे परंतु माझ्या मुली नेहमी मला प्रेरित करतात, जेणेकरून मी काम करू शकेन. एकदा मी ट्विंकलला सांगितले की मला आता काम करायचे नाही. आता पुरे झाले. माझी प्रकृतीही आता ठीक नाही. येथे प्रचंड तणावाचे वातावरण आहे. आई डिम्पल कपाडियाचे हे शब्द ऐकून ट्विंकलने प्रश्न विचारले आणि तिने अजूनही काम का करावे हे तिला समजावून सांगितले. पण खरंच हे करण्याची गरज का आहे? असा प्रश्न डिम्पल यांना पडला होता. त्या वेळी ट्विंकल म्हणाली, तुला पैशाची गरज आहे का? डिम्पल हो म्हणाल्या. तेव्हा ट्विंकलने आईला आराम सोडून कामावर जाण्याचा सल्ला दिला होता.

डिम्पल कपाडिया म्हणाल्या की आजही त्यांनी एखादा प्रोजेक्ट नाकारला तर तिची टीम लगेचच धाकट्या मुलीला रिंकी खन्नाला फोन लावते. डिम्पल म्हणाल्या, “मी एखादा प्रोजेक्ट नाकारला तर टीम माझी धाकटी मुलगी रिंकीला फोन करते आणि मग ती मला फोन करते. पण त्यांनी पुन्हा काम करायला प्रोत्साहन दिलं याचा मला खूप आनंद आहे.”