सुपरस्टार राजेश खन्ना आणि ज्येष्ठ अभिनेत्री डिंपल कपाडिया यांची मोठी मुलगी अभिनेत्री ट्विंकल खन्ना आहे. ट्विंकल अभिनयक्षेत्रात सक्रिय नाही, मोजकेच काही चित्रपट केल्यानंतर तिने बॉलीवूडला रामराम केला. तिने इंडस्ट्री सोडून दोन दशकांचा काळ लोटला आहे. चित्रपटांमध्ये अभिनय करत नसली तरी ट्विंकल मुलाखती देत असते आणि तिचे अनुभव सांगत असते. ती उत्तम लेखिका आहे.
४१ वर्षांच्या संसारानंतर आंतरधर्मीय लग्नाबाबत नसीरुद्दीन शाह म्हणाले, “मला हिंदू असलेल्या रत्नाशी…”
अभिनयाची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील ट्विंकलनेही तिच्या वडिलांप्रमाणे अभिनय करण्याचा मार्ग निवडला, मात्र तिने जास्त काळ काम केलं नाही. आता ती लेखिका म्हणून ओळखली जाते. ट्विंकलने पुस्तकं लिहिली आहेत आणि मासिकांमध्ये स्तंभलेखनही केले आहे. पण तिच्या एका कॉलममध्ये तिने आई डिंपलसाठी जे लिहिलं होतं, ते वाचून तुम्ही थक्क व्हाल.
ट्विंकल खन्ना आई डिंपलच्या खूप जवळ आहे. वडील राजेश खन्ना यांच्या निधनानंतर ती आईच्या जवळ आली. पण एकदा असं काही घडलं होतं की ट्विंकलला तिच्या आईचा प्रचंड राग आला होता. तिला इतका राग आला होता की तिला आईचा गळा दाबायची इच्छा झाली होती, पण तिने कसंतरी स्वतःला रोखलं. एका कॉलममध्ये तिने या गोष्टीचा उल्लेख केला होता.
ट्विंकल म्हणाली होती की एकदा तिच्या केसांच्या हायलाइटवर आई डिंपलने कमेंट केली होती. “तुझ्या केसांकडे पाहून असं वाटतंय की कोणीतरी पान खाऊन त्यावर थुंकलं आहे,” असं डिंपल म्हणाल्या होत्या. हे ऐकून ट्विंकल रागाने लाल झाली आणि ती आईचा गळा दाबणार नाही. पण तिने तिच्या हातांवर नियंत्रण ठेवलं. ‘आईने गमतीत माझ्या केसाच्या हायलाइटवर कमेंट केली होती, मात्र मला खूप राग आला होता, तिच्या त्या टिप्पणीनंतर तिला तिचा गळा दाबावा वाटत होता, पण मी स्वतःला आवरलं’ असं ट्विंकल म्हणाली होती.