शाहरुख खानच्या बहुप्रतिक्षित ‘जवान’ चित्रपटाचा प्रिव्ह्यू आज प्रदर्शित झाला आहे. चाहते बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाच्या ट्रेलरच्या प्रतीक्षेत होते. आज अखेरीस प्रिव्ह्यू प्रदर्शित झाला आणि चाहत्यांचा उत्साह सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. प्रिव्ह्यू पाहिल्यानंतर नेटकरी सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया देत आहेत.
शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा, अभिनेता विजय सेतूपती, दीपिका पदुकोण यांच्यासह तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. ट्रेलरमधील अॅक्शन सीन्स प्रेक्षकांना फारच आवडले आहेत. या प्रिव्ह्यूबद्दल नेटकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत, ते जाणून घेऊयात.