Anant Ambani Radhika Merchant Pre Wedding : रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमाची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. गुजरातमधील जामनगर येथे १ मार्च ते ३ मार्च दरम्यान हा कार्यक्रम पार पडणार आहे. यासाठी बॉलीवूडसह राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी खास उपस्थिती लावली आहे.
अनंत-राधिका यांच्या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे जामनगरला पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी फोटोंसाठी एकत्र पोज दिल्याचं पाहायला मिळालं.
हेही वाचा : रिहाना एका कार्यक्रमासाठी किती मानधन घेते? अनंत अंबानी-राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंगमध्ये करणार परफॉर्म
अनंत अंबानींचे बालपण जामनगरमध्ये गेले आहे. तसेच त्यांच्या आजी कोकिलाबेन अंबानी यांचा जन्म देखील याठिकाणी झाला असल्याने अंबानी कुटुंबीयांनी प्री-वेडिंग कार्यक्रमासाठी जामनगरची निवड केली. सध्या बॉलीवूडपासून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सिनेस्टार अनंत-राधिकाला शुभेच्छा देण्यासाठी जामनगरमध्ये दाखल झाले आहेत.
हेही वाचा : “२९ फेब्रुवारी तुझा वाढदिवस”, मृणाल कुलकर्णींनी विराजसला दिला खास सल्ला; लेकाला म्हणाल्या, “जसे कष्ट…”
शाहरुख खान व कुटुंबीय, सलमान खान, अर्जुन कपूर, जान्हवी कपूर, अभिषेक बच्चन यांच्यासह अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी प्री-वेडिंग कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत. या सोहळ्याला १ मार्चला सायंकाळी सुरुवात होईल, या कार्यक्रमासाठी १ मार्चला ‘एलिगंट कॉकटेल’ तर २ मार्चला ‘जंगल फिव्हर’ या ड्रेस कोड ठेवण्यात आला आहे.